Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

750 0

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे. सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बातमीने चित्रपट सृष्टी आणि रसिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हे प्रकरण नेमके काय आहे हे स्वतः सयाजी शिंदे यांनीच एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

गुरुवारी सयाजी शिंदे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात भरती केले होते. त्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. या संदर्भातली सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayaji Shinde (@sayaji_shinde) 

व्हिडिओत काय म्हणाले सयाजी शिंदे ?
‘माझे जे सर्व रसिक, प्रेक्षक-हितचिंतक यांच्या मला खूप शुभेच्छा आल्या. त्या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की, माझी तब्येत चांगली आहे. खबरदारी म्हणून मी काही तपासण्या केल्या होत्या, तेव्हा हृदयात एक ब्लॉकेज होतं, जे सहजर निघालं. भविष्यात नंतर कधीतरी हार्ट अटॅक येऊ शकला असता. असं ते ब्लॉकेज होतं पण ते आता निघालं आहे. पुढचे दहा वर्ष मी छान काम करू शकतो. काळजी करू नका लवकरच आपल्या सेवेत परत येईल. माझ्या बाबतीत च्या बातम्या तुम्ही ऐकत आहात त्या सगळ्या कशाच्या तशाच नाहीत. पण मी ठीक आहे, आनंदी आहे. त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद’, अशा शब्दात सयाजी शिंदे यांनी आपला भावना व्यक्त केल्या आहेत.

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, गायक यांचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन झाले आहे. त्यामुळेच सयाजी शिंदे यांना हृदय रोगाच्या कारणाने दवाखान्यात भरती केले असल्याचे समजतात त्यांच्या चाहत्यांना त्यांची चिंता वाटू लागली. मात्र आता त्यांच्यावरची सर्जरी यशस्वी झाली असून ते पूर्णपणे ठीक असल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

‘आपला आदेश आम्हाला शिरसावंद्य’; भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याचे राज ठाकरेंना भावनिक पत्र

Uddhav Thackeray : नकली शिवसेना म्हणता ती तुमची डिग्री आहे का? उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News

Related Post

युक्रेन रशियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावला अभिनेता सोनू सूद

Posted by - March 5, 2022 0
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध पाहता जग सध्या चिंतेत आहे. परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेकांना युद्धाच्या काळात देशात अडकलेल्या…

#Bikini PhotoShoot : मोनी रॉयच्या बिकनी फोटोशूटने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ ; चहाते झाले घायाळ ! फोटो पहाचं

Posted by - February 6, 2023 0
#Bikini PhotoShoot : मोनि रॉय ही बॉलीवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या आकर्षक नाक नक्शामुळे आणि बांधेसूद फिगरमुळे अनेक जण…
Kangana Ranaut

Kangana Ranaut : कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली ‘तो महिलांचा फायदा…’

Posted by - August 15, 2023 0
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. कधी तिच्या काही पोस्ट तर कधी तिचे चित्रपट……
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *