Sankarshan Karhade

Sankarshan Karhade : राजकारणावर आधारित संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

1190 0

मुंबई : संकर्षण कऱ्हाडेंच्या (Sankarshan Karhade) कविता कायमच प्रेक्षांच्या पसंतीस पडतात. विषय कुठलाही असला तरी संकर्षणच्या शब्दांची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम होत असते.संकर्षणची अशीच एक कविता सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातवरण असतानाच कलाकारांच्या सोशल मीडिया पोस्ट, त्यांची वक्तव्य, त्यांच्या पुढील भूमिका या कायमच प्रेक्षनकांच्या उत्सुकतेचा विषय असतात.अश्यातच संकर्षणने देखील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक खास कविता केली आहे.

संकर्षणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही कविता पोस्ट केली आहे. या पोस्टला कॅप्शन देत लिहले की, सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर काही लिहिण्याचा मनापासून प्रयत्नं केला आणि प्रेक्षकांनी काल तो प्रयत्नं अगदी मनापासून स्विकारला. तुम्हीही ऐका. पहा आणि मनापासून सांगा की तुमच्याही मनांत हेच आहे का ..? महाराष्ट्राच्या सध्या राजकीय परिस्थितीवर केलेली ही कविता अनेकांच्या पसंतीस उतरतेय. त्याच्या कवितेवर अनेकांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

संकर्षणची कविता नेमकी काय?
सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं
खात्या-पित्या घरचे पण, दु:खी मला वाटलं.
माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं
अन् मी जवळ जाऊन म्हटलं काय हो काय झालं?
तुमच्यापैकी कोणाला काय झालंय का?
तिन्ही सांजेला असे बसलात कुणी गेलंय का?
कुटुंबप्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसास
डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते ढसाढसा
तर, ऐक तुला सांगतो म्हणाले, असं झालंय
आम्हा सगळ्या कुटुंबीयांचं एक-एक मत वाया गेलंय.
आता माझा नातू बघ नुसता जीवाला घोर आहे ( नातवापासून त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केली)
सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच जोर आहे
बरं एवढं करून मत दिलं, तरीही याचं भागलं नाही
पण, याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही.
मग, ती सभा, ती गर्दी, तो आवाज, ती घोषणा त्याचं पुढे काय झालं? मग, याचं मत पुढे तीन-चार वेळा असंच वाया गेलं.
आता माझ्या या दुसऱ्या नातवाची अन् त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाइफ आहे.
ना करिअर, ना ग्रोथ है…ना जिंदगी मैं वाइफ है.
अरे बाबा! वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कोणी आणत नाही.
भारतभर चालून तुझी पावलं दमली पण, हात काही चालत नाही.
मग ते धोतर, ती काठी, तो चष्मा, ते आडनाव त्याच पुढे काय झालं? आणि असं करत याचंही मत पुढे बरीच वर्षे वाया गेलं
आता माझ्या या मुलाला पण बरं का…राजकारणातलं फार कळतं. याचं मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळतं
चुकली वेळ, झाला खेळ…वेगळंच संधान साधलं. एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वत:च्या हातावर बांधलं.
मग नवा साहेब, घड्याळ तेच पुन्हा वेळ पाळू का?
की, जुन्या साहेबांबरोबर राहून तुतारीतून आवाज काढू का?
मग, ते वय, तो अनुभव, ती निष्ठा, तो परिवार त्याचं पुढे काय झालं? असं करत माझ्या या मुलाचं मत मात्र वाया गेलं.
आता माझी ही सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची. जरा कुणी नडलं ना, की घरातला बाण काढायची. मी तिला कितीदा म्हटलं, सूनबाई बाण जपून वापरायचा असतो गं…एकदा हातातून सुटला की, परत येत नसतो गं.
मग, जी मनातही नव्हती ती भीती खरी झाली अहो! जिथे शब्दांनी आग लागायची, तिथे हातात मशाल आली.
मग तो बाण, तो बाणा, ते कडवट, ते सैनिक यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या सुनेचं मत मात्र वाया गेलं.
आता ही माझी बायको बरं का…घडवेल तेच घरात घडतं. नाव हीच लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं.
मी लगेच त्यांना विचारलं…माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल. अहो कमळ जिथल्या तिथेच आहे मग, यांचं मत वाया गेलं नसेल.
आजोबा म्हणाले, ती दु:खात नाहीये तशी पण, तिच्या मनात तळमळ आहे. कारण, ज्यांच्याविरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे.
अहो! ते विरोधक, हे सत्ताधारी, हे प्रामाणिक, ते बाजारी यांच्यात असं काय झालं? पण, असं करत माझ्या या बायकोचं आता वाटतंय मत मात्र वाया गेलं.
त्यामुळे पुढाऱ्यांनो तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की, हाच माझा पक्ष आहे. तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की, आमचं तुमच्याकडे लक्ष आहे.
त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Crime : मुंबई हादरली ! सख्या भाऊ बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Narayan Rane : ही माझी शेवटची निवडणूक: नारायण राणेंची मोठी घोषणा

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Sharad Pawar : शरद पवार गटाचा जाहीरनामा जाहीर

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Weather Update : राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस; हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Accident News : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; 12 जण जखमी

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share This News

Related Post

मराठीमधील सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित, २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला (व्हिडिओ)

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये…
Gautami Patil Vs Madhuri Pawar

Gautami Patil Vs Madhuri Pawar : महाराष्ट्र गाजवणाऱ्या गौतमी पाटील आणि माधुरी पवार या नृत्यांगना आल्या समोरासमोर; कोण कोणावर पडलं भारी?

Posted by - August 9, 2023 0
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या दोन व्यक्ती म्हणजे नृत्यांगना माधुरी पवार आणि गौतमी पाटील (Gautami Patil Vs Madhuri Pawar). या दोघींनीही नृत्य…
Monsoon News

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

Posted by - May 31, 2024 0
मुंबई : मान्सून भारतात दाखल झाला आहे. मान्सूनचं (Monsoon Update) केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे.10 जूनपर्यंत…
Ajmal Shareef

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Posted by - December 11, 2023 0
मुंबई : आजकाल लोकांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक धक्कादायक घटना केरळमधून समोर आली आहे. यामध्ये एका 28…

गाढवाने लाथ मारायच्या आधी…;फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समाचार

Posted by - May 14, 2022 0
१ मे महाराष्ट्र दिनी मुंबईत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भव्य अशी ‘बुस्टर डोस’ सभा होती. या पोलखोल यात्रेतून भाजप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *