Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

980 0

मुंबई : रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी एकूण सहा राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या घराच्या बाल्कनीत देखील झाडण्यात आली होती. ही संपूर्ण फायरिंगची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आरोपीबद्दल ‘ही’ माहिती आली समोर
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हा गुरुग्रामचा असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दोन आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला त्यातील एक आरोपी हा हरियाणाच्या गुरुग्राममधील असल्याचा संशय आहे. संबंधित आरोपीचा हत्या आणि दरोड्या सारख्या अनेक गंभीर गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग आहे.

दरम्यान सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण यंत्रणा या प्रकरणाच्या तपासाला लागली आहे. या प्रकरणात आता तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पनवेल येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सूरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Thane Accident

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
ठाणे : ठाण्यातील भिवंडीमधून (Thane Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळच्या सुमारास एका ऑटो रिक्षाचा अपघात…
Terror Attack In Sydney

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Posted by - April 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला (Terror Attack In Sydney) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक लोकांचा…
Akola News

Akola News : बायकोन जीवन संपवलं, पतीची पोलिसांना माहिती मात्र, शवविच्छेदन अहवालात ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 14, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन…

Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या

Posted by - May 10, 2024 0
नाशिक : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी एका तरुणाची गोळ्या घालून हत्या (Crime News) करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *