Saisha Bhoir

Saisha Bhoir : साईशा भोईरने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका; ‘ही’ बालकलाकार करणार रिप्लेस

2238 0

मुंबई : मराठी बालकलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचे मनोरंजन करत होती. मात्र आता तिने ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सोडल्याचे समजत आहे. साईशाच्या कुटुंबीयांनी तिच्याबाबत हा निर्णय घेतला आहे. साईशा (Saisha Bhoir) सध्या तिच्या आजी-आजोबांसोबत राहत आहे. आधी तिची आई तिला सेटवर नेऊन सोडायची आणि तिला घेऊन यायची. मात्र आजी-आजोबांना हे सर्व करणं शक्य नसल्याने साईशाने मालिका सोडली आहे.

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

पैशांच्या फसवणूकप्रकरणी साईशाच्या आईला अटक झाल्यानंतर निर्मात्यांनी तिला मालिकेतून काढल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र साईशा भोईर हिने कुटुंबियांच्या सांगण्यावरून ही मालिका सोडल्याने या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे. आता ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आरोही सांबरे ही साईशाची जागा घेणार आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेत आता आरोही चिंगीची भूमिका साकारणार आहे”, असे मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

काय आहे नेमके प्रकरण?
साईशाची (Saisha Bhoir) आई पूजा भोईर यांना पैशांच्या हेरगिरीप्रकरणी मे 2023 मध्ये अटक झाली होती. आता त्यांची कोठडी 7 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकतंच पोलिसांनी पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्तासुद्धा जप्त केली. साईशाची आई पूजा भोईर याच मुलीचं सोशल मीडिया पेज सांभाळत होत्या. या प्लॅटफॉर्मचा गैरफायदा घेत त्यांनी गुंतवणूकदारांशी संपर्क साधला.यानंतर त्यांनी गुंतवणूक दारांना पैसे परत करण्यास नकार दिला होता.

Share This News

Related Post

Akola Maarhan

खासगी बसचालकाकडून एसटी बस चालकाला मारहाण (Video)

Posted by - May 21, 2023 0
अकोला : अकोल्यामध्ये (Akola) एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून शेगाव…
Bhiwandi News

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Posted by - April 3, 2024 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत भिवंडीत चाकू हल्ला करण्यात…
Girish Chaudhari Bail

Girish Chaudhary Bail : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर

Posted by - July 21, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना (Girish Chaudhary Bail) अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात…
Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Posted by - September 9, 2023 0
पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *