Saif Ali Khan

सैफ अली खानच्या अडचणीत वाढ! 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ प्रकरण आले अंगलट

1292 0

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. 11 वर्षांपूर्वीचे एक प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. 11 वर्षांपूर्वी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकासोबत झालेले भांडण आणि साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने सैफ अली खानवर आरोप निश्चित केले आहेत. तसेच हा खटला पार्ट मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात चालवण्यात येणार आहे. यामुळे सैफ अली खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदारांना समन्सही बजावले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 15 जून रोजी होणार आहे. या प्रकरणी सैफने 2017 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली आणि अतिरिक्त आरोप निश्चित करण्याच्या विरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र 2019 मध्ये न्यायालयाने सैफची याचिका फेटाळली होती.

काय आहे ते प्रकरण?
हे प्रकरण 22 फेब्रुवारी 2012 मधील आहे. यावेळी सैफ अली खान आणि तक्रारकर्ते त्यांच्या मित्रांसोबत फाइव्ह स्टारमध्ये जेवत असताना त्यांच्यात बाचाबाची झाली होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) व्यावसायिक इक्बाल शर्मा (Iqbal Sharma) यांनी सैफ अली खान आणि त्याच्या मित्रांना मोठ्याने बोलण्यावर आक्षेप घेतला. यानंतर सैफने इक्बाल आणि त्याचे सासरे रमणभाई यांना धमकी दिली. तसेच सैफने इक्बालला धक्काबुक्कीसुद्धा केली होती.

Share This News

Related Post

Gadar 2 Movie

सनी देओल आणि अमीषा पटेलचा गदर 2 रिलीजपूर्वीच अडकला वादाच्या भोवऱ्यात? काय घडले नेमके?

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा बहुप्रतक्षित गदर 2 या सिनेमाचे…
Saisha Bhoir

Saisha Bhoir : साईशा भोईरने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका; ‘ही’ बालकलाकार करणार रिप्लेस

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : मराठी बालकलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘चला…
Sajjan Jindal

Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JSW समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या…
Docudrama

Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

Posted by - March 4, 2024 0
अहेरी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Docudrama) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या ‘धर्मरावबाबा…
Teen Adkun Sitaram

Teen Adkun Sitaram : बहुचर्चेतील चित्रपट ‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ गाणं प्रदर्शित

Posted by - September 20, 2023 0
‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट (Teen Adkun Sitaram) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *