Breaking News
Sahil Khan

Sahil Khan : साहिल खानला ‘त्या’ प्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

857 0

मुंबई : अभिनेता साहिल खान (Sahil Khan) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी साहिल खानला आज मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सायबर सेल त्याची चौकशी करणार आहे. समन्स बजावूनदेखील साहिल खान अद्याप चौकशीला हजर झालेला नाही.

सोशल मीडियावर साहिल खान अ‍ॅक्टिव्ह
साहिल खानची एकीकडे चौकशी होणार असल्याचं समोर आलं आहे. पण चौकशीसाठी तो येणार की नाही याची अजून खात्री झालेली नाही. मात्र चौकशीच्या फेऱ्यात असणारा साहिल खान सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे. ‘गुड मॉर्मंग जुमा मुबारक’ असं म्हणत साहिलने ट्विट केलं आहे. अडचणीत असतानाही आपण कसे एन्जॉय करतोय हे सिद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडून तो सध्या कुठे आहे याची माहिती घेतली जात आहे. साहिल खान महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात आरोपी असून सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

साहिल खानवर काय आहे आरोप ?
साहिल खानचे नाव एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 आहे. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अ‍ॅप चालवल्याचा आरोप आहे, तो म्हणजे साहिल खानवर केवळ प्रमोशनचाच नाही तर अ‍ॅप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. त्यावेळी प्रमोशनल व्हिडीओ म्हणून त्याचे वर्णन करण्यात आले होते. आता एफआयआरमध्ये अ‍ॅप ऑपरेटर म्हणून नाव आल्याने साहिल खानच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Related Post

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात ; नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Posted by - April 2, 2022 0
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रमाणेच त्यांचा मुलगाही दिसतो एकदम देखणा

Posted by - July 1, 2023 0
अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ ही तिच्या साध्या लुकसाठी प्रसिद्ध आहे . परंतु ती साध्या लुकमध्ये सुद्धा प्रेक्षकांना भुरळपाडल्या शिवाय राहत नाही.…

दसवी फेल की पास ? सिनेमा फेल पण अभिषेक पास (व्हिडिओ)

Posted by - April 8, 2022 0
अभिषेक बच्चन, यामी गौतम आणि निम्रत कौर स्टारर चित्रपट ‘दसवी’ नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत…

प्रियंका आणि निकचे ‘ते’ फोटो व्हायरल ; युजर म्हणाले ‘हे तुला अजिबात सूट करत नाहीये’…

Posted by - September 27, 2022 0
प्रियंका चोप्रा ही बॉलीवूड आणि हॉलीवुड मध्ये एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयामुळे आजपर्यंत यशाची अनेक शिखरे सर केली…
Sai Tamhankar

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नागराज मंजुळेच्या ‘या’ वेबसिरीजमध्ये झळकणार

Posted by - June 14, 2024 0
मुंबई : बॉलिवूड, हिंदी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आता पुन्हा एकदा हिंदीतील मोठ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *