Ray Stetvson

‘RRR’ फेम अभिनेते रे स्टीव्हनसन यांचे निधन

459 0

मुंबई : ‘गंदी बात’ फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी ताजी असताना आता मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॉलिवूडचे (Hollywood) प्रसिद्ध अभिनेते रे स्टीव्हनसन (Ray Stevenson) यांचे वयाच्या 58 व्या वर्षी निधन (Pass Away) झाले आहे. आयरिश वंशाचा अभिनेता शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिसला होता. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांनी, म्हणजेच 25 मे रोजी रे यांचा वाढदिवस होता. रे स्टीव्हनसन यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रे स्टीव्हनसन यांचा ‘RRR’ हा कारकिर्दीतील पहिला भारतीय चित्रपट होता. रे यांचा जन्म 25 मे 1964 रोजी उत्तर आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांचे वडील पायलट होते आणि वयाच्या 8 व्या वर्षी ते कुटुंबासह इंग्लंडला गेले होते. रे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. ‘पनीशर: वॉर जान’, ‘द थिअरी ऑफ फ्लाइट’, ‘किंग आर्थर’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासोबतच ते ‘द वॉकिंग डेड’, ‘स्टार वॉर्स’, ‘वायकिंग्स’, ‘ब्लॅक सेल्स’, ‘डेक्स्टर’ सारख्या शोमध्ये त्यांनी काम केले आहे. 1998 मध्ये आलेल्या ‘थ्योरी ऑफ फ्लाईट’ या चित्रपटाद्वारे त्यांना मोठ्या पडद्यावर पहिला ब्रेक मिळाला होता.

Share This News

Related Post

Gas Cylinder

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Posted by - April 1, 2024 0
मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. देशातील चार महानगरांमध्ये गॅसचे…

#boycottlaalsinghchaddha चा फटका बसण्याची आमिरला वाटते भीती ? एस.एस. राजामोली यांनी सांगितलेल्या ‘त्या’ सल्ल्यानंतर आमिर खानने केले लाल सिंह चड्ढा फिल्ममध्ये मोठे बदल

Posted by - August 2, 2022 0
मुंबई : मिस्टर परफेक्ट आमिर खानची नवीन फिल्म लाल सिंह चड्ढा रिलीज होण्यापूर्वीच विवादांमध्ये अडकला आहे. #boycottlaalsinghchaddha मुळे सध्या अमिरवर…
Maharashtra Political Crisis

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

Posted by - June 3, 2024 0
मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Mumbai News) भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन…
Modi And Shah

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

Posted by - April 2, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र…

बिपाशा बासूने शेअर केले आपल्या चिमुकल्या ‘देवी’चे फोटो

Posted by - April 6, 2023 0
अभिनेत्री बिपाशा बासू म्हणजे बॉलिवूडची एकेकाळची मादक सौंदर्याची अभिनेत्री. विविध सिनेमांमधून तिने आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. तिचा अभिनय देखील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *