मुंबई : रणवीर सिंग याने अभिनेता म्हणून आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत . पण सध्या तो त्याच्या चित्रपटा मुळे नाही तर त्याच्या एका फोटोशूट मुळे चर्चेत आला आहे. नुकतेच रणवीर सिंगने एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले .
त्याच्या या फोटोशूटवरून सिने जगतातील काही कलाकारांनी प्रोत्साहन पर प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु सामान्यांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांनी त्याच्या या फोटोशूटची अवहेलनाच केली आहे. त्याच्या या फोटोशूटच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे रणवीरच्या संकटात वाढ होते आहे.
दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी देखील रणवीर सिंगवर कडाडून टीका केली होती. तर मिनी चक्रवर्ती यांनी देखील “हेच फोटोशूट जर एखाद्या महिलेने केले असते तर” ? असा सवाल उपस्थित केला आहे .
तर दुसरीकडे प्रियंका चोप्रा मसाबा गुप्ता यांनी मात्र बेस्ट कव्हर शूट अशी कमेंट करून रणवीरचे कौतुक केले आहे. एका एनजीओच्या वतीने रणवीरच्या विरोधात ही FIR दाखल करण्यात आली आहे.
त्याचबरोबर तक्रारदारांनी रणवीरच्या अटकेची देखील मागणी केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. रणवीर विरुद्ध IPC कलम 509, 292, 294 आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.