Ramayan

Ramayan : रामानंद सागर लिखित रामायण मालिकाही अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; काय होतं कारण?

558 0

रामायणाच्या (Ramayan) कथेवर आधारित असलेला आदिपुरुष हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा रामानंद सागर यांच्या रामायणाची सगळ्यांना आठवण झाली. रामायण बघावं तर रामानंद सागर यांचच अशाही अनेक प्रतिक्रिया आल्या. रामानंद सागर यांचे ‘रामायण’ पुन्हा दाखवण्याचा आग्रह प्रेक्षकांनी धरला आहे. तसेच चित्रपटाची तुलना देखील या मालिकेसोबत होऊ लागली. पण त्या लोकप्रिय टीव्ही मालिकेवरही सरकारने 2 वर्षांची बंदी घातली होती. ही बंदी नेमकी कशामुळे घालण्यात आली होती चला पाहूया…..

https://youtu.be/gpP-_hD_53s

Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

1987 मध्ये पौराणिक टीव्ही मालिका ‘रामायण’चा पहिला भाग प्रसारित झाला होता. 78 भागांची ही मालिका सर्वांना इतकी आवडली होती की आजही त्यातील पात्रांची देवासारखी पूजा केली जाते. 36 वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. लॉकडाऊन मध्ये ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली होती. लॉकडाऊन मध्ये या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला.लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच ही मालिका अजूनही आवडते. मात्र ती लोकांसमोर आणण्यासाठी निर्मात्यांना दोन वर्षे सरकारी कार्यालयात चपला झिजवाव्या लागल्या. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी एक पुस्तक लिहिले होते. ‘अ‍ॅन एपिक लाइफ: रामानंद सागर फ्रॉम बरसात टू रामायण’ अस या पुस्तकाच नाव आहे, ज्यामध्ये त्यांनी या मालिकेशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख केला होता. हा कार्यक्रम प्रसारित करण्यास दूरदर्शनचे मालक किंवा सरकार तयार नसल्याच त्यांनी पुस्तकात लिहिल होते. दोघेही मालिकेच्या विरोधात होते. कारण त्यांना ही कल्पना आवडली नव्हती. रामानंद सागर यांनी बनवलेले तीन पायलट एपिसोड नाकारले. पण नंतर बऱ्याच संघर्षानंतर याला ग्रीन सिग्नल मिळाला आणि तो प्रसारित झाला.

सुनील लहरी यांनीही अनुभव सांगितला, ते म्हणाले आदिपुरुषाला ज्या प्रकारे विरोध केला जात आहे तसाच रामायणालाही विरोध झाला होता. कार्यक्रमात सीतेच्या ब्लाउजवर मंत्रालयाने आक्षेप घेतला होता. माता सीता स्लीव्हलेस ब्लाउज घालू शकत नाही, अस त्यांनी म्हटले होत. एवढेच नाही तर दूरदर्शननेही याला विरोध केला होता. मात्र विरोध होऊनही रामानंद सागर यांनी हार मानली नाही आणि दीपिका चिखलिया यांची सीतेची वेशभूषा पुन्हा तयार केली. फुल स्लीव्ह ब्लाउज बनवून त्यानुसार साडीची रचना करण्यात आली होती. त्यानंतरच ही मालिका लोकांसमोर आणली गेली. आणि असे करायला जवळपास दोन वर्षे लागली. तोपर्यंत ही मालिका थांबवण्यात आली होती. पण 2 वर्षांच्या या प्रयत्नांच फळ त्यांना मिळालं. प्रेक्षकांनी ही मालिका प्रचंड डोक्यावर घेतली.

Share This News

Related Post

#PATHAN : प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगसह 21 कोटींहून अधिकचा गल्ला; पठाणमुळे बंगाली चित्रपटांना मिळेना शो; निर्मात्यांनी केली ‘ही’ मागणी

Posted by - January 24, 2023 0
#PATHAN : शाहरुख खान चार वर्षांनंतर ‘पठाण’ या स्पाय थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एवढ्या दिवसानंतर किंग खानला चित्रपटगृहात…
Prasad Sutar

Adipurushच्या VFX साठी 250 कोटी वापरणारा मराठमोळा प्रसाद सुतार आहे कोण?

Posted by - June 17, 2023 0
मुंबई : 16 जून रोजी बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो खूप चर्चेत होता. या चित्रपटाचा…
Harish Magon

Harish Magon Pass Away : बॉलीवूड अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : बॉलिवूडमधून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 70-80च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण…
Gautami Patil

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पत्रकारांना मारहाण

Posted by - May 17, 2023 0
नाशिक : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर…

बाहुबली दिसणार आता ‘श्रीरामांच्या’ भूमिकेत ; दिग्दर्शक ओम राऊतकडून व्हिडीओ शेअर

Posted by - April 10, 2022 0
‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘बाहुबली’च्या राम भगवान अवताराची एक झलक शेअर केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *