Surinder Shinda Death

Surinder Shinda Death : 15 दिवसांआधी आल्या होत्या मृत्यूच्या अफवा; अखेर प्रसिद्ध गायकाचे आज झाले निधन

353 0

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी सिंगर सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांचे आज निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते. मागच्या दोन आठवड्यांहून अधिक काळ ते रूग्णायलात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेवटच्या काही दिवसांत त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सकाळी 7.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. ‘ट्रक बिलिया’, ‘पुत्त जट्टान दे’ सारखी अनेक हिट गाणी त्यांनी गायली होती. त्यांच्या निधानामुळे पंजाबी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

धक्कादायक म्हणजे 14 दिवसांआधीच सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या मुलाने फेसबुक लाइव्ह करत ते सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. सुरिंदर शिंदा यांच्यावर एक महिन्याआधी एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शरिरात इन्फेक्शन वाढले होते.

सुरिंदर शिंदा (Surinder Shinda Death) यांचं खरं नाव पाल धम्मी असं होतं. ‘पुत्त जट्टन दे’, ‘जट जियोना मोर’, ‘ट्रक बिलिया’, ‘बलबीरो भाभी’ आणि ‘काहर सिंह दी’ ही त्यांनी गायलेली काही प्रसिद्ध गाणी आहेत.

Share This News

Related Post

Prashant Damle

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती.…
Gangu Ramsay

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Posted by - April 8, 2024 0
मुंबई : बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचा वेगळा ट्रेंड सेट करणारे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर गंगू रामसे (Gangu Ramsay) यांचे निधन…

मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार…
Eknathrao Danve

Ambadas Danve : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पितृशोक

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या वडिलांचं निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. अंबादास…

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

Posted by - March 19, 2022 0
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *