Pillu Bachelor

Pillu Bachelor : ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थ भालेराव करणार कल्ला

567 0

मुंबई : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा याची अनुभूती देणारा बहुचर्चित ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा (Pillu Bachelor) ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात तुम्हाला एकच कल्ला पाहायला मिळणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून लोकांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘हे’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत ?
‘पिल्लू बॅचलर’ या सिनेमात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे, भारत गणेशपूरे, सविता मालपेकर, अक्षय टांकसाळे, किशोर चौघुले असे उत्तमोत्तम कलाकार आहेत. मंगेश कागणे यांनी या चित्रपटाचे गीतलेखन केले आहे. चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी ‘पिल्लू बॅचलर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन तानाजी घाटगे यांनी केलं आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?
वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्षाची गोष्ट ‘पिल्लू बॅचलर’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. मात्र प्रेमकथा, त्याला हलक्या विनोदाचा तडका सिनेमात असल्याचं सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे हा सिनेमा लोकांचे पुरेपूर मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘पिल्लू बॅचलर’ या नावामुळे लोकांना या चित्रपटाची अजून उत्सुकता लागली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Share This News

Related Post

दीपिकाच्या भगव्या बिकनी वादावर मिलिंद सोमणचे मत; म्हणाला, “ही कला की अश्लीलता याचा विचार…!”

Posted by - December 19, 2022 0
मुंबई : नुकताच पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या गाण्यांमध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोर्ड दाखवला…

Latur Crime News : लातूरमध्ये सिटी बसच्या चालक-वाहकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण

Posted by - February 7, 2024 0
लातूर : लातूरमधून (Latur Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहकाला…
Prashant Damle

Prashant Damle : प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

Posted by - October 17, 2023 0
मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle)…

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटानं केली 116 कोटींची कमाई

Posted by - March 19, 2022 0
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.  चित्रपट पाहून लोकांच्या डोळ्यातील अश्रू आवरता येत नाहीत,…
Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई यांचे आत्महत्येची ‘न्यायालयीन चौकशी’ व्हावी : गोपाळ तिवारी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्रातील नामवंत, मनस्वी व जेष्ठ कला दिग्दर्शक स्व. नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या ॲाडीओ क्लिप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *