Ruby Tandon

Ruby Tandon : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी निघाली बोगस डॉक्टर; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

1913 0

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन (Actor Amit Tandon) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमित टंडन याची पत्नी आणि डर्मॅटॉलॉजिस्ट रुबी टंडन (Ruby Tandon) हिच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रुबी टंडन ही प्रसिद्ध सेलिब्रिटी डॉक्टर आहे. मात्र ती बोगस डिग्री वापरत क्लिनिक चालवत असल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिची डिग्री बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर वांद्रे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रसिद्ध डर्मॅटॉलॉजिस्ट डॉ. रुबी टंडन हिला समन्स बजावण्यात आले आहे. वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोडवर रुबी हिचे शिफा वेलनेस क्लिनिक आहे.

डॉ. रुबी टंडन हिची पदवी अथवा डिग्री ही बनावट असून त्याची चौकशी करण्याची गरज असल्याची लेखी तक्रार एका अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे वांद्रे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी हे पत्र खारमधील एच/वेस्ट वॉर्डमधील बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चव्हाण यांना पाठवले. त्यानंतर डॉ.चव्हाण आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलशी संपर्क साधला. यामध्ये डॉ. रुबी टंडन यांची नोंदणी नसल्याचे बीएमसीच्या तपासादरम्यान आढळून आले. त्यानंतर वांद्रे पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप केरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि बीएमसीच्या संयुक्त पथकाने क्लिनिकमध्ये जाऊन डॉ. टंडन आणि त्यांच्या पतीची चौकशी केली.

यावेळी त्यांना पदवी प्रमाणपत्र दाखवण्यास सांगितले असता, डॉ. रुबी टंडन यांनी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणी प्रमाणपत्राची कलर प्रिंटआउट आणि मेडिकल कौन्सिलचा परवाना सादर केला. मात्र या प्रमाणपत्रांवर डॉ रुपिंदर धालीवाल आणि रुपिंदर टंडन जगत धालीवाल अशी नावे होती. प्रमाणापत्रावर असलेल्या वेगवेगळ्या नावांची पोलिसांनी चौकशी केली असता , लग्नापूर्वी आपले आडनाव धालीवाल होते, असे रुबी टंडन यांनी स्पष्ट केले.त्यानंतर ही सर्टिफिकेट्स जारी करणार्‍या संस्थेच्या वेबसाइटवर प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांना जुळणारी कोणतीही नोंद आढळून आली नाही. यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वांद्रे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

UPI Payment

UPI Transaction Limit : गूगल-पे, Paytm वापणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने ‘या’ नियमांत केले बदल

Posted by - December 8, 2023 0
मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात डिजिटल पेमेंटमध्ये (UPI Transaction Limit) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. आजकाल…

पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखताच दोन तरुणांनी उचलले टोकाचे पाऊल

Posted by - March 31, 2023 0
काल गुरुवारी सर्वत्र रामनवमीचा सण मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. या उत्सवादरम्यान परभणी जिल्ह्यातील मानवत शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.…
Sharad Pawar

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांनी आकडेवारीसकट दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज पत्रकार परिषद घेत राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी…
Suicide News

Suicide News : ऑनलाइन रमीमध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - July 10, 2023 0
पुणे : सध्या तरुणाईमध्ये आत्महत्यांचे (Suicide News) प्रमाण खूप वाढले आहे. एका शुल्लक कारणावरून काही लोक आत्महत्येसारखे (Suicide News) टोकाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *