Gadar 2 And Subhedar

Movies Release In August 2023 : ‘गदर 2’ ते ‘सुभेदार’; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना अनुभवायला भेटणार ‘या’ चित्रपटांचा थरार

465 0

ऑगस्ट महिना चित्रपट प्रेमींसाठी (Movies Release In August 2023) खास असणार आहे. या महिन्यात (Movies Release In August 2023) रसिकांना काही मोठे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सनी देओलच्या ‘गदर 2’ या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात नेमके कोणते बिग बजेट सिनेमे रिलीज होणार आहेत….

गदर 2 (Gadar 2) – 11 ऑगस्ट 2023
‘गदर 2’ या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल हे दोघे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘गदर 2’ हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट गदरचा सिक्वेल असणार आहे.

OMG 2: Akshay Kumar fans wrote an open letter to Anurag Thakur requesting  for timely release of the film | OMG 2: अक्षय कुमार के फैंस ने अनुराग ठाकुर  को लिखा ओपन

ओएमजी 2 (OMG 2) – 11 ऑगस्ट 2023
खिलाडी अक्षय कुमारचा ‘ओएमजी’ (OMG) हा बहुचर्चित सिनेमा 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षयच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत या सिनेमाची गणना होते. आता ‘ओएमजी 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

तारीक (Tarik) – 15 ऑगस्ट 2023
‘तारीक’ (Tarik) या सिनेमामुळे अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) चर्चेत आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अरुण गोपालन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जॉन स्वत: या बहुचर्चित सिनेमाचा निर्मातादेखील आहे.

Akelli (2023) - IMDb

अकेली (Akelli) – 18 ऑगस्ट 2023
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. तिच्या आगामी सिनेमांच्या यादीत ‘अकेली’ या सिनेमाचाही समावेश आहे. हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अकेली’चं मोशन पोस्टर आऊट झालं असून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

Dream Girl 2 Movie 2023 - Netflix Plans

ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) – 25 ऑगस्ट 2023
2019 मध्ये आलेला ‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. ‘ड्रीम गर्ल 2’चा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात पूजा भट्ट आणि आयुष्मान खुराना हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Subhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर  प्रदर्शित Subhedar Marathi Movie Teaser Out Digpal Lanjekar Subhedar Movie  Tanaji Malusare Movie Know Details

सुभेदार (Subhedar) – 18 ऑगस्ट 2023
‘सुभेदार’ मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर या सिनेमात तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share This News

Related Post

Sridevi Prasanna

Sridevi Prasanna : “दिल में बजी गिटार”; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमातील नवं गाणं रिलीज

Posted by - January 21, 2024 0
मुंबई : सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर अभिनीत ‘श्रीदेवी प्रसन्न’ (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या…
KBC 15

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Posted by - November 23, 2023 0
‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमाने (KBC 15) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच घर केले आहे. सध्या या कार्यक्रमाचा 15 वा सिझन…

बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता ‘ररा’ लघुपटात

Posted by - August 7, 2022 0
पुणे : महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध ‘ररा’ हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या…

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव

Posted by - March 28, 2022 0
सिंधुदुर्ग- कोकण म्हणजे सृष्टी सौंदर्याचा अनमोल खजिना, नारळी पोफळीच्या बागा, हापूस आंब्याचा दरवळ, फेसाळ लाटा अंगावर झेलणारा समुद्रकिनारा,जांभ्या दगडाची कौलारू…

अभिनेत्री श्वेता तिवारीने गंमतीत केलेले विधान आलंय तिच्याच अंगलट

Posted by - January 27, 2022 0
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील एका वक्तव्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *