Pravin Raja Karale

Pravin Raja Karale Pass Away : प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

994 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजन विश्वातले अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा तांबे आणि सुलोचना दीदी यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाले हि घटना ताजी असताना आता मनोरंजन विश्वातल्या अजून एका कलाकाराने जगाचा निरोप घेतला (Pravin Raja Karale Pass Away) आहे. या कलाकाराचे नाव आहे प्रवीण राजा कारळे.

ते एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मनोरंजन सृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. प्रवीण कारळे यांनी आज (23 जून) सकाळी दहा वाजता पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. प्रवीण कारळे हे सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे यांचे चिरंजीव होते.

Subhedaar Movie Teaser : शिवराज अष्टकातील पाचवे अष्टक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ओम राऊतच्या तान्हाजीला देणार टक्कर ?

प्रवीण राजा कारळे यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते. अगदी लहानपणापासूनच त्यांनी चित्रपटसृष्टीतील बारकावे समजून घेतले होते. त्यांचे ‘बोकड’, ‘भैरू पैलवान की जय’, ‘मानसन्मान’, ‘माझी आशिकी’, ‘हृदयात समथिंग समथिंग’ हे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Share This News

Related Post

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

Posted by - December 22, 2022 0
लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या…
Sanjay Raut And Ajit Pawar

धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

Posted by - June 3, 2023 0
नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले.…
Anurag Thakur

Asian Games : चीनने भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंवर बंदी घातल्याने अनुराग ठाकूर यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - September 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशच्या मुद्द्यावरून चीन भारताला वारंवार डिवचताना दिसत आहे, यामुळे भारत आणि…

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा

Posted by - March 10, 2022 0
देशभर सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. आज या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *