kangana ranaut

Kangana Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड सोडणार’, कंगना रणौतचे मोठे वक्तव्य

752 0

हिमाचल प्रदेश : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून कंगनाला भाजप कडून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाचा सध्या लोकसभेचा जोरदार प्रचार सुरु आहे. आपला विजय होईल असा विश्वासही कंगना व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान कंगनाने वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना बॉलिवूड करिअरसंबंधीत एक वक्तव्य केले आहे.

‘या’ कारणांमुळे कंगना बॉलीवूड सोडणार का?
कंगनाला चित्रपट आणि राजकारण हे दोन्ही एकाच वेळी कसे मॅनेज करते यावर प्रश्न विचारल्यानंतर म्हटलं की, मी चित्रपटांमध्ये कंटाळून जाते. मी भूमिका करते, दिग्दर्शनही करते. पण जर मला राजकारणामध्ये माझ्याशी लोकं जोडली जात आहेत, असं दिसलं तर मग मी फक्त राजकारणच करेन. कारण मला एका वेळी एकच काम करायचे आहे.

पुढे ती म्हणाली की, जर मला वाटलं की लोकांना माझी गरज असेल तर मी त्याच दिशेला जाईन आणि जर मी मंडीतून निवडून आले तर मी राजकारणच करेन. मला अनेक दिग्दर्शकांनी सांगितलं की, राजकारणात नको जाऊस. पण मला लोकांच्या विश्वासाला खरं उतरायचं आहे. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होऊ देणं हे योग्य नसल्यामुळे जर मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ते देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केले पाहिजे.

राजकारण आणि चित्रपटांमध्ये काय फरक?
राजकारण आणि चित्रपटांमध्ये काय फरक आहे? यावर बोलताना कंगना म्हणाली की, चित्रपटाचे जग हे खोटं असतं, पण राजकारण हे वास्ताविक जग आहे. चित्रपटाचे वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी रंगवल्या जातात. पण राजकारणात तसं नसतं. इथे लोकांच्या विश्वासाला खरं उतरावं लागतं. मी या क्षेत्रात नवीन आहे, त्यामुळे मला इथून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार राज ठाकरे यांची भेट ; मनसे-भाजप युतीचे संकेत ?

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच नवीन खळबळ उडवणारी घटना घडते आहे. सर्वप्रथम भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार, काय आहे कारण ?

Posted by - May 28, 2022 0
मुंबई- भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी समीर थिगळे फेरनिवड

Posted by - April 20, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समीर थिगळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते…

मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…
Devendra Fadanvis Tension

Devendra Fadanvis : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Posted by - September 14, 2023 0
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरु केलेलं बेमुदत उपोषण अखेर आज 17 दिवसांनी मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी आपला लढा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *