IFFI

IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ 3 मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

607 0

मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (IFFI) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

‘या’ 3 चित्रपटांची झाली निवड
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘ग्लोबल आडगाव’ (Global Aadgaon), ‘गिरकी’ (Girki) आणि ‘बटरफ्लाय’ (Butterfly) या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘फिल्म बाजार ‘ या गटात दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.

या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागासाठी सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात जुना तसेच भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे.

Share This News

Related Post

Dani Li

Dani Li : बारीक व्हायला गेली अन् जीवानिशी गेली; ‘या’ प्रसिद्ध गायिकेचा धक्कादायक मृत्यू

Posted by - January 27, 2024 0
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. सुंदर दिसण्यासाठी…

11 लाखांच्या पैठणीवर आदेश बांदेकरांनी दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले…

Posted by - April 18, 2022 0
महामिनिस्टरच्या नव्या ‘शो’मध्ये वहिनींना आदेश बांदेकर तब्बल 11 लाखांची पैठणी देणार आहेत. 11 लाखांच्या पैठणीची घोषणा करताच सोशल मीडियावर काही…

‘The Invisibles with Arbaaz Khan’ : सलमान खानच्या आईला पाहून हेलन लपून बसायची ; अभिनेत्री हेलनने सांगितले त्या काळातले किस्से !

Posted by - February 20, 2023 0
‘The Invisibles with Arbaaz Khan’ : भाऊ अरबाज खान सध्या ‘द इनविंसिबल्स विथ अरबाज खान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शोच्या…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : ‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’ शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उपलथापालथं पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *