Manik Bhide

Manik Bhide : अनेक गायक-गायिकांना घडवणारा आवाज हरपला ! शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन

828 0

मुंबई : संगीतसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Manik Bhide) यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. माणिक भिडे (Manik Bhide) यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक गायक-गायिकांना घडवले आहे. गेल्या काही वर्षेापासून माणिक भिडे यांना पार्किन्सन्स या असाध्य व्याधीनं ग्रासलं होतं. यावर उपचारही सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

माणिक भिडे यांच्याविषयी थोडक्यात माहिती
माणिक गोविंद भिडे यांचा 1935 मध्ये कोल्हापूर इथं जन्म झाला. बालवयापासून संगीताची आवड असलेल्या माणिकताईंना आई-वडिलांकडून अभिजात संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळालं होतं. जयपूर- अत्रोली घराण्याचे आदयपुरुष उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र उस्ताद मजी खाँ व भूर्जी खाँ साहेब यांची तालीम लाभलेले मधुकरराव सडोलीकर हे माणिकताईंना गुरू म्हणून लाभले होते. गोविंद भिडे यांच्याशी विवाह होऊन माणिकताई मुंबईस वास्तव्याला आल्या. या काळात सुमारे 15 वर्षे गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे शिष्यत्व माणिकताईंनी पत्करुन गानसाधनेतला कळस गाठला होता.

माणिकताईंनी आपल्या कारकिर्दीत अनेक शिष्य घडवले. त्यातील अश्विनी भिडे-देशपांडे या त्यांच्या कन्या. त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे या व अनेक शिष्यांना त्यांनी घडवलं. कलाकर, गुरू व एक व्यक्ती म्हणून माणिक भिडे यांचं सुसंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. माणिक भिडे यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Share This News

Related Post

भन्नाट ! बऱ्याच दिवसनंतर काहीतरी चांगलं पाहायला मिळणार ; कत्रिनाच्या ‘फोनभूत’ चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : गेली अनेक दिवस बॉलीवूडवर एक मरगळ आली आहे. प्रेक्षकांना चांगलं असं काही पाहायला मिळतच नाही, किंवा एखादा ट्रेलर…
Kavita Chaudhary

Kavita Chaudhary : उडान फेम प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी यांचं निधन

Posted by - February 16, 2024 0
अमृतसर : प्रसिद्ध अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांचे…

#URFI : उर्फी जावेदचा फॅशन सेन्स पाहून चहाते म्हणाले; अरे देवा ! फक्त दोऱ्यांवर टिकवला ड्रेस… PHOTO

Posted by - February 20, 2023 0
मुंबई : उर्फी जावेद ही एक मॉडेल आहे. दिसायला सुंदर आणि कमनीय बांधा असलेली ही मॉडेल तिच्या कामापेक्षा विचित्र फॅशन…
Ritu Karidhal

Ritu Karidhal : चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या रितू कारिधाल कोण आहेत?

Posted by - July 14, 2023 0
मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज महत्वकांक्षी चांद्रयान 3 लाँच केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन…

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Posted by - January 20, 2024 0
अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *