Aparna Nair

South Actress Death: साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

1383 0

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून (South Actress Death) नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साऊथ (South Actress Death) मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन झाले आहे. या 31 वर्षीय अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अपर्णाच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. तिच्या निधनाने सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली आहे. अभिनेत्रीच्या आई आणि बहिणीला याची माहिती मिळेपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, अपर्णा यांना निपचित पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अभिनेत्री अपर्णा नायर यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अपर्णा यांच्या पश्चात पती संजीत आणि दोन मुली श्रेया आणि कृतिका असा परिवार आहे. अभिनेत्री अपर्णा नायर इन्स्टाग्रामवरही खूप सक्रिय होत्या. मृत्यूच्या काही वेळ आधीच त्यांनी आपल्या मुलीचा एक व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर अपर्णा नायर यांनी ‘चंदनमाझा’, ‘आत्मसखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’ आणि ‘देवस्पर्शम’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. याशिवाय त्या ‘मल्लू सिंग’, ‘थट्टाथिन मरायाथू’ आणि ‘जोशीज रन बेबी रन’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील झळकल्या होत्या.

Share This News

Related Post

Beed News

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

Posted by - July 4, 2023 0
बीड : बीडमध्ये (Beed News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Beed News) गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन प्राध्यापकांना अपघातात आपला जीव…

दुःखद : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन; सिनेजगतावर शोककळा

Posted by - November 26, 2022 0
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल आहे. अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात…
Viral Video

Viral Video :धबधब्याखाली मौजमजा करणे बेतले जीवावर; धक्कादायक Video आला समोर

Posted by - August 21, 2023 0
पावसाचे दिवस सुरु होतात त्यावेळी प्रत्येकाचेच पाय पावसाळी सहलींच्या ठिकाणांकडे (Viral Video) वळतात.देशाच्या विविध भागांमध्ये पावसादरम्यानच हे असंच चित्र असतं.…
Death of Trekker

Death of Trekker : हरिशचंद्र गडावर गेलेल्या त्या पर्यटकाचा मृत्यू नेमका कसा झाला? 2 दिवसांनी समोर आलं धक्कादायक कारण

Posted by - August 9, 2023 0
नाशिक : सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांची मोठ्या (Death of Trekker) प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पावसाळी…
Kelvin Kiptum

Kelvin Kiptum : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन

Posted by - February 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅरेथॉनचा विश्वविक्रमवीर अ‍ॅथलिट केल्विन किप्टम (Kelvin Kiptum) याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.तो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *