Prashant Damle

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामलेंची निवड

548 0

मुंबई : पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागून राहिली होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले (Prashant Damle) यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगे यांचा समावेश आहे. नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. “नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली आहे. तसेच नाट्यपरिषदेच्या कार्यवाहकपदी अजित भुरे निवडून आले आहेत. तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडकडून पुनीत बालन यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

Posted by - July 5, 2024 0
पुण्यातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले पुनीत बालन यांचा भारतीय संरक्षण दलाच्या दक्षिण कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…
Narendra Dabholkar

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Posted by - May 10, 2024 0
कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. तब्बल 11 वर्षांनी…

शिवसेनेचे उपनेते यांच्या घरावर आयकर विभागाची धाड, काय आहे प्रकरण ?

Posted by - February 25, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. भाजप नेते किरीट…
Aatmapamphlet Movie

Aatmapamphlet Trailer : आपल्या बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर रिलीज

Posted by - September 16, 2023 0
अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर (Aatmapamphlet Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *