Dev Kohli

Dev Kohli Passed Away : गीतकार देव कोहली यांचे निधन

642 0

ज्येष्ठ गीतकार देव कोहली (Dev Kohli) यांचे निधन झाले आहे. आज सकाळी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.अखेर आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. देव कोहली यांचे आज पहाटे चार वाजता झोपेतच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘बाजीगर’, ‘जुडवा 2’, ‘मुसाफिर’, ‘इश्क’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘टॅक्सी नंबर 911’ सारख्या शेकडो सुपरहिट सिनेमांची गाणी लिहिली आहेत. देव कोहली यांनी सलमान खानच्या (Salman Khan) ‘मैंने प्यार किया’ या ब्लॉकब्सटर सिनेमातील ‘कबूतर जा जा’, ‘आज शाम होने आयी’, ‘आते जाते हाथते’, ‘काहे तोसे सजना’ यांसारखी सुपरहिट गाणी लिहिली आहेत.

देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’ सिनेमातील ‘गाता हूं मैं’; ‘हम आपके हैं कौन’मधील माई ना माई मुंडेर पर तेरी बोल रहा है कागा, ‘बाजीगर’ सिनेमातील ‘काली आंखें’, ‘जुडवा 2’ सिनेमातील ‘चलती है क्या नौ से बारह’, ‘मुसाफिर’मधील ‘ओ साकी साकी’ अशी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राम लक्ष्मणपासून अन्नू मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज आनंदपर्यंत अनेक बड्या संगीतकारांसोबत काम केले होते.

Share This News

Related Post

Prajakta Mali

Prajakta Mali : प्राजक्ता माळी झळकणार ‘या’ चित्रपटात; पोस्ट शेअर करत म्हणाली “दुनिया गेली तेल लावत…”

Posted by - August 24, 2023 0
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात (Prajakta Mali) एक वेगळी जागा निर्माण केली आहे.…
Nick Jonas

निक जोनासने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो; नेटकरी म्हणाले…..

Posted by - June 13, 2023 0
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही (Priyanka Chopra) सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर…

CM Eknath Shinde : मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान ; ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’ अजय देवगण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Posted by - July 22, 2022 0
मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ…

तो मी नव्हेच ! ‘आप’ल्याला यामध्ये ओढू नका’ अभिनेता संदीप पाठक यांनी का केले स्पष्ट?

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- सध्या मराठी अभिनेता संदीप पाठक चर्चेत आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पंजाब राजकारणात चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात…

रणबीर- आलियाच्या वयातील अंतर; आलिया रणबीरपेक्षा ‘इतक्या’ वर्षांनी आहे लहान

Posted by - April 14, 2022 0
प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं.अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या आहेत, ज्यांच्या वयामध्ये कमालीचं अंतर आहे. त्यामुळेच रणबीर- आलियाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *