Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

401 0

पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या लघुपटाची निवड करण्यात आलीय. मेघ पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘Cue Kya Tha’ या लघुपटात नाशिकहून मुंबईत ॲक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या तरुणाची गोष्ट दाखवण्यात आलीय. 12 ते 22 ऑक्टोबर दरम्यान कॅनडामध्ये भरणाऱ्या या महोत्सवात हा सिनेमा दाखवला जाणार आहे.

Cue kya tha हा लघुपट बापटजींच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या अनिल देशपांडे या तरुणाच्या भोवती ही कथा आहे. या लघुपटात अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी बापटजींची भूमिका साकारली आहे. तसेच शौनक अय्यर याने अनिल शर्मा या तरुणाची भूमिका साकारली आहे. या लघुपटात मुझम्मिल कुरेशी, सोनल सागोरे, मिनिम डे, प्रेरक मेहता, कुणाल शर्मा, सुतोपा सरकार, आकाश जैन यांनी सहाय्यक भूमिकेचे काम पार पाडले आहे.

https://instagram.com/cuekyatha?igshid=NjIwNzIyMDk2Mg==

मेघ पाटील आणि हसन नुलवाला यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. ईशान घोष यांनी छायाचित्रण केले असून शरद जोशी यांचं धमाल संगीत लाभलेल्या या लघुपटासाठी शरीन देवस्थळी यांनी वेशभूषा साकारल्या आहेत. डीओपी ईशान घोष यांनी या लघुपटासाठी सिनेमॅटोग्राफी केली असून प्रोडक्शन डिझायनरची धुरा मेहेक कौर सोधी यांनी सांभाळली आहे. रांजबती सरकार यांनी आपले संपादन कौशल्य वापरून एक उत्कृष्ट लघुपट तयार केला आहे. चीफ असिस्टंट डायरेक्टर कुणाल शर्मा, कास्टिंग डायरेक्टर सहिल शर्मा आणि आर्ट डायरेक्टर मीनल भोला यांच्या कलात्मक नजरेतून हा अप्रतिम लघुपट साकारला आहे. डीआयटी म्हणून अजय खामकर आणि आणि ग्राफिक्सचे काम शिवम त्रिपाठी यांनी पाहिले आहे. आसाराम शिंदे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. हरीन जोशी आणि जान्हवी आरएन यांनी डायरेक्शन टीम मध्ये एकत्र काम केलंय.

IFFSA Toronto हा दक्षिण आशियाई चित्रपटांसाठीचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय महोत्सव मानला जातो. गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी कॅनडामध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात दक्षिण आशियाई संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वैविध्यपूर्ण अशा सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड केली जाते. तसेच Beyond South Asia विभागांतर्गत निवडक परदेशी चित्रपटांचा विचार देखील केला जातो.

Share This News

Related Post

Yerwada Jail

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Posted by - November 21, 2023 0
पुणे : कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पळाला आहे.आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

Posted by - September 26, 2022 0
पुणे : २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर मा. सर्वोच्च न्यायालयाकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आले असून, मा. सर्वोच्च…
Pune News

Pune News : मोदिजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Posted by - September 18, 2023 0
पुणे : दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांच्या जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा (Pune News) अंतर्गत माझ्या…

Chandrakant Patil : राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग…

प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे श्याम’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा ट्रेलर (व्हिडिओ )

Posted by - March 11, 2022 0
मुंबई- अभिनेता प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट आज म्हणजेच 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *