city of dreams

प्रतीक्षा संपली ! ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

572 0

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स ‘ (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची उत्सुकता लागून राहिली होती. काही दिवसांपूर्वी या सिरींजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमधील डायलॉगानी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे प्रेक्षकांना या सिरीजची अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. या सिरीजमध्ये प्रेक्षकांना सत्तेसाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’मध्ये काय पाहायला मिळणार?
पहिल्या दोन सीझनमध्ये गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी होतं. सत्तेसाठी प्रियजनांची हत्या किंवा मुलीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात केलेला प्रवेश असो, या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्या आहेत. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये जगदीश गुरव आपली इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत. या सिरीजमध्ये साम दाम दंड भेदाचा अवलंब करत सत्ता बळकावण्याचा प्रयत्न होताना दिसणार आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ कधी होणार रिलीज?
‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ (City Of Dreams 3) या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत आहेत. 26 मे 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share This News

Related Post

Viral Dance Video

Viral Dance Video : सोनाली कुलकर्णी-फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा गाण्यावर केला डान्स

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाचे एक वेगळे स्थान असते. अनेकजण या पावसाचा मनमुराद…
Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - April 14, 2024 0
मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली…
Oscar New Rules

Oscar New Rules : ‘ऑस्कर’चे नवे नियम जाहीर; चित्रपट निर्मात्यांना आता ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

Posted by - June 23, 2023 0
मुंबई : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत असा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar New Rules) आणि वाद एक समीकरण तयार झाले आहे.…

अभिनेत्री पूनम पांडे जिवंत! का पसरवली निधनाची अफवा? समोर आला आहे कारण

Posted by - February 3, 2024 0
अभिनेत्री पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अचानक, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *