Chala Hawa Yeu Dya

Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? ‘हे’ कारण आले समोर

1029 0

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) हा मराठी लोकप्रिय कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. हा कार्यक्रम निरोप घेणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हा कार्यक्रम कोणत्या कारणामुळे निरोप घेणार आहे ते कारणदेखील समोर आले आहे.

‘या’ कारणाने ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या कार्यक्रमाचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. एकीकडे टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झी मराठीवर एक नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला स्लॉट मिळत नसल्याने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहे. नवा कार्यक्रम संपल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम हे सर्व विनोदवीर घराघरांत पोहोचले. या कलाकारांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली. या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Share This News

Related Post

Nilesh Rane

Nilesh Rane : फडणवीसांचा ‘तो’ सल्ला ऐकून निलेश राणेंनी निवृत्ती घेतली मागे

Posted by - October 25, 2023 0
मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. ती आता त्यांनी…
Lalit Patil

Lalit Patil : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं.. ललीत पाटीलचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - October 18, 2023 0
मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा आरोपी 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला होता.…
Mumbai Crime News

Mumbai Crime News : खाकीला काळिमा ! ATS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - October 14, 2023 0
मुंबई : ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा…
city of dreams

प्रतीक्षा संपली ! ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Posted by - May 23, 2023 0
मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स ‘ (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांना या सीरिजच्या…
Sharad Pawar and Ajit Pawar

NCP News : अजित पवार आणि शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संपूर्ण यादी आली समोर

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी (NCP News) महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादीच्या (NCP News) दोन्ही गटाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *