Luana Andrade

Luana Andrade : हृदयविकाराचा झटका आल्याने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचा दुर्दैवी मृत्यू

616 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये 29 वर्षीय ब्राझिलियन मॉडेल व एन्फ्लुएन्सर लुआना अंद्राज (Luana Andrade) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साओ पाउलो येथील रुग्णालयात तिच्या गुडघ्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया (Liposuction Surgery) केल्यानंतर तिचे निधन झाले. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर तिला हृदयविकाराचे सलग 4 झटके (Heart Attack) आले आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शस्त्रक्रिया सुरू असताना लुआनाचं हृदय तब्बल अडीच तास बंद पडलं, त्यानंतर डॉक्टरांनी फॅट रिमूव्हल प्रक्रिया थांबवली आणि तिला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला. तिला हृदयविकाराचे चार झटके झाले, तिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. दरम्यान, लुआनाची वैद्यकीय तपासणी केल्यावर असं दिसून आलं की तिला फुफ्फुस एम्बोलिझमचा (Pulmonary Embolism) त्रास होता, जो थ्रोम्बोसिसशी संबंधित होता.

यानंतर तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले जेथे तिच्यावर औषधोपचार आणि हेमोडायनामिक उपचार करण्यात आले. पण त्याचा फायदा झाला नाही आणि मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास लुआनाला मृत घोषित करण्यात आले. लुआना अंद्राज ही पॉवर कपल 6 मधील तिच्या कामासाठी आणि ब्राझिलियन टीव्ही शो, डोमिंगो लीगल मधील स्टेज असिस्टंट म्हणून ओळखली जात होती.

हे पण वाचा
नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर पडून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

सलमानच्या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही मॉडेल आहे तरी कोण ?

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

मैं अटल हूं! पंकज त्रिपाठी साकारणार अटल बिहारी वाजपेयी

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसणार…
Sayaji Shinde

Sayaji Shinde : हृदयात ब्लॉकेज, सर्जरी होताच सयाजी शिंदेंनी पोस्ट केला चाहत्यांसाठी व्हिडिओ

Posted by - April 12, 2024 0
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत…
Joe Lindner Pass Away

Joe Lindner Pass Away : बॉडीबिल्डर जो लिंडनरचं वयाच्या 30 व्या वर्षी निधन

Posted by - July 2, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूट्यूबच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला बॉडीबिल्डर जो लिंडनर याचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन (Joe Lindner…

बगळ्याची शिकार करणाऱ्या मुलांवर सयाजी शिंदे संतापले!

Posted by - June 19, 2022 0
  मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सयाजी शिंदे यांनी चित्रपटांमध्ये अनेक वेळा नकारात्मक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *