Gangu Ramsay

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

669 0

मुंबई : बॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांचा वेगळा ट्रेंड सेट करणारे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर गंगू रामसे (Gangu Ramsay) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय 83 असून 7 एप्रिल 2024 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगू रामसे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्यामुळे मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामसे ब्रदर्स या नावानं ते प्रसिद्ध असल्यासोबतच हॉरर चित्रपटाचे किंग म्हणून त्यांची ओळख होती.

फतेह चंद रामसिंघानी हे चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव असून गंगू रामसे हे त्यांचे दुसरे पुत्र होते. इंग्रजांच्या काळात फतेह चंद रामसिंघानी यांना त्यांच्या नावावरून अनेक अडचणी आल्यामुळे त्यांनी त्यांचे नाव बदलून रैमसे ठेवल्यांनंतर त्याचे रामसे असे झाले. फतेह चंद यांना सात मुलं असल्यामुळे रामसे ब्रदर्स अश्या नावाने हॉरर सिनेमांचा ब्रँड तयार करत रामसे ब्रदर्स सिल्वर स्क्रिनवर प्रेक्षकांना घाबरवण्यात आणि हॉरर चित्रपट बनवण्यात यशस्वी ठरले.

गंगू रामसे यांनी ‘वीराना’, ‘पुराना मंदिर’, ‘बंद दरवाजा’, ‘दो गज जमीन के नीचे’, ‘सामरी’, ‘तहखाना’, ‘पुरानी हवेली’ आणि ‘खोज’ सारखे क्लासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले. या सिनेमांची सिनेमेटोग्राफी गंगू रामसे यांनी केली होती. त्याचप्रमाणे त्यांचा खिलाडीयों का खिलाडी, सबसे बडा खिलाडी हे सिनेमे देखील केले आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 70-80 दशकात 45 हून अधिक सिनेमे केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

Anup Ghoshal

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं…
SSC-HSC Exam

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Posted by - January 17, 2024 0
मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेला (SSC-HSC Exam) पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…
Cyclone

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

Posted by - June 12, 2023 0
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 500 ते 600 किमी दूर असून ते…
Mumbai Map

महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; नवीन यादी आली समोर

Posted by - May 17, 2023 0
मुंबई : राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा (New District) तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार (Population) जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *