Shah Rukh Khan

Don 3 : किंग खानने ‘या’ कारणामुळे नाकारला ‘डॉन 3’ चित्रपट; कारण ऐकून व्हाल थक्क

488 0

बॉलीवूडचा बादशहा म्हटलं तर एकच नाव पुढे येत ते म्हणजे शाहरुख खान. शाहरुख ने आपल्या काळात बरेच सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्याचा जवान हा नवीन चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. यादरम्यान दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तर याने ” Don 3″ या चित्रपटाचा टीझर लाँच केला आहे. त्या सोबत एक पोस्ट पण शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवरून शाहरुखच्या फॅन्सनी नाराजी व्यक्त्त केली आहे. कारण 2025 मध्ये प्रदर्शित होणार डॉन 3 या चित्रपटामध्ये यंदा शाहरुख खान दिसणार नाही आहे.

1978 मध्ये अमिताभ बच्चन डॉनच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर आले आणि त्यांनी सर्वांची मनं जिंकली. यानंतर 2006 मध्ये फरहान अख्तरने हा चित्रपट ट्विस्ट घेऊन रिमेक केला, ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट हिट झाला आणि शाहरुखच्या स्वॅगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डॉनच्या यशानंतर फरहान अख्तरने 2011 साली Don 2 रिलीज केला आणि पुन्हा एकदा चित्रपटाने धमाका केला. मात्र, तेव्हापासून चाहते डॉन 3 ची वाट पाहत आहेत. नुकताच डॉन 3 चा टीझर रिलीज झाला. यामध्ये रणवीर सिंग हा डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ कारणामुळे शाहरुख खानने नाकारला डॉन 3
हाती आलेल्या माहितीनुसार, जेव्हा शाहरुख खानला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली गेली तेव्हा त्याला ती फारशी आवडली नाही. शाहरुखने ही स्क्रिप्ट साफ नाकारली असं नाही, पण अभिनेता स्क्रिप्टशी कनेक्ट होऊ शकला नाही. त्यामुळे शाहरुख खानने फरहान अख्तरच्या या चित्रपटाला नकार दिला. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

Ram Gopal Varma

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची होणार राजकारणात एंट्री, ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधुम पाहायला (Ram Gopal Varma) मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह…

#BOLLYWOOD : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सतीश कौशिक यांचं आज सकाळी निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 67…

URFI JAVED : आता २ मोबाईल्स पासून बनवला असा ड्रेस; उर्फीच्या फॅशन सेन्सवर तुमचं मत काय ?

Posted by - November 18, 2022 0
उर्फी जावेद आणि तिचा फॅशन सेन्स याविषयी खरंतर नव्याने काही सांगायला नकोच… जी वस्तू हाती लागेल त्याच्यापासून तिचा आऊटफिट तयार…
Shreyas Talpade

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Posted by - January 3, 2024 0
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने श्रेयस तळपदेची प्रकृती बिघडली होती.…

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा टिझर

Posted by - March 4, 2022 0
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *