Abdu Rozik

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

445 0

मुंबई : तजाकिस्तानचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता अब्दू रोझिकचे (Abdu Rozik) जगभरात चाहते आहेत. रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 16 मध्येही सर्वात प्रसिद्ध कंटेस्टेंट होता. मात्र, आता अब्दू रोजिकच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग केस प्रकरणात अब्दुचे नाव समोर आले आहे. ईडीने 14 फेब्रुवारी रोजी त्याला समन्स बजावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याची ईडीकडून चौकशी होणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अब्दू रोझिक गायक आणि अभिनेता होण्याबरोबरच एक बिझनेसमॅनदेखील आहे. अब्दूचे अनेक देशात अलिशान हॉटेल आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर अब्दूने मुंबईमध्येही बुर्गिर नावाचे आलिशान हॉटेल सुरू केले होते. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या या हॉटेलमध्ये कोणत्यातरी दुसऱ्याच कंपनीने पैसे लावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी ड्रग्सचा व्यवहार करते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच ईडीने अब्दू रोझिकला समन्स पाठवले आहेत व त्याची चौकशी केली जात आहे.

बिग बॉस 16मधून मिळाली प्रसिद्धी
अब्दू रोझिक जगभरात लोकप्रिय आहे मात्र भारतात त्याला प्रसिद्धी मिळाली ती सलमान खानच्या बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून. बिग बॉसमध्ये सगळ्यांना अब्दूचा खोडकर अंदाज पाहायला मिळाला. त्याच्या या खोडकर स्वभावामुळे त्याचे फॉलोवर्स वाढले. तर सलमान खानचाही तो आवडता कंटेस्टंट बनला. अब्दू बिग बॉस 16 चा पॉप्युलर चेहरा होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

Chandra Mohan

Chandra Mohan : दाक्षिणात्य अभनेते चंद्र मोहन यांचे निधन

Posted by - November 11, 2023 0
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेता, कॉमेडियन मल्लमपल्ली चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचे निधन झाले आहे. आज…
Ankita Lokhande

Ankita Lokhande : बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन

Posted by - August 13, 2023 0
मुंबई : पवित्र रिश्ता फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिता लोखंडे (Ankita…

सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले अजूनही व्हेंटिलेटरवर; प्रकृती पुन्हा खालावली

Posted by - November 26, 2022 0
पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सुमारे २० दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा…
Pu La Deshpande

‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ पु.ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से

Posted by - June 12, 2023 0
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल. देशपांडे (Pu La Deshpande) यांची आज पुण्यतिथी आहे. पु. ल. देशपांडे यांची महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व,…
Harish Salve

Harish Salve : ज्येष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे तिसऱ्यांदा चढले बोहल्यावर

Posted by - September 4, 2023 0
देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) हे वयाच्या 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *