Allu Arjun

Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली

765 0

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. अल्लू हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने अभिनयाव्यतिरिक्त आपल्या कृत्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनने दारू आणि तंबाखूची जाहिरात करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अल्लू अर्जुनने नाकारली 10 कोटी रुपयांची ऑफर
अल्लू अर्जुनला एका दारूच्या आणि तंबाखूच्या कंपनीने एका जाहिरातीसाठी विचारणा केली होती. या जाहिरातीसाठी अल्लू अर्जुनला 10 कोटी रुपये मिळणार होते. पण अल्लू अर्जुनला कोणताही वाईट संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे त्याने ही जाहिरात करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ (Pushpa The Rise) हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमातील अभिनयासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘पुष्पा 2’ या सिनेमात अल्लू अर्जुनचा आणखी धमाकेदार अंदाज पाहायला मिळणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सई पल्लवी ‘पुष्पा 2’ या सिनेमात झळकणार आहे. ‘पुष्पा 2’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसह, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Related Post

BOLLYWOOD : कतरीना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या माथेफिरूच्या विरुद्ध विकीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ; विकीला दिली जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : बॉलीवूड जगतातील विशेष करून अभिनेत्रींना त्यांच्या फॅन्स कडून अनेक वेळा विक्षिप्त अशा कमेंट्स येत असतात. त्यांच्या सोशल मीडिया…

जिओचा उपग्रह आधारित ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश, एसईएससह देशभरात सेवा सुरू करणार

Posted by - February 14, 2022 0
मुकेश अंबानी यांची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म आणि जगभरातील उपग्रह-आधारित कनेक्टिव्हिटी कंपनी एसईएस यांनी सोमवारी जिओ स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड नावाचा संयुक्त…
IFFI

IFFI : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘या’ 3 मराठी चित्रपटांची निवड; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (IFFI) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली. यासंदर्भात…

‘झुंड’ चित्रपट म्हणजे अडथळे, संघर्ष आणि प्रश्न हा संपूर्ण प्रवास

Posted by - March 4, 2022 0
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे आणि जसं म्हणायचं आहे ते तो चित्रपटात मांडतो. मग समोर कितीही मोठा कलाकार…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’चं शूटिंग पूर्ण; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Posted by - February 20, 2024 0
जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *