२१ व्या पिफसाठी मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात

224 0

पुणे, दिनांक २२ सप्टेंबर : पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ २०२३’ साठी मराठी चित्रपट स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. सन २०२२ मध्ये सेन्सॉर मिळालेल्या आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेश अर्ज करता येईल. पिफ २०२३ दिनांक १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रवेश अर्ज करताना २ डीव्हीडी किंवा व्हिडीओ लिंक आणि पासवर्ड पाठवणे आवश्यक असून प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६ पर्यंत अशी आहे.

 

चित्रपटाचे शिर्षक आणि बॅनर हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदणीकृत असावे, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतच सिनेमा पूर्ण केला गेलेला असावा त्याचे व कोणतेही पोस्ट-प्रोडक्शन संबंधी काम बाकी नसावे, संबंधित चित्रपटाची निर्मिती ही सन २०२२ मध्येच झाली आहे यासाठी लॅब अथवा स्टुडीओ चे पूर्ततापत्र सादर करून व त्याची डीसीपी प्रिंट दाखवण्यास तयार आहे हे प्रमाणित करून द्यावे आदी बाबींची पूर्तता पिफ २०२३ साठी अर्ज करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांनी करावयाची आहे. सदर प्रमाणपत्र फक्त २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा करिता ग्राह्य धरण्यात येईल याची निर्मात्यांनी कृपया नोंद घ्यावी. पिफ आणि चित्रपट महामंडळ यांनी घालून दिलेले सर्व नियम व अटी सर्व प्रवेशिकांवर लागू असतील.

अधिक माहिती https://www.piffindia.com/ या पिफच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Share This News

Related Post

युजरने अभिषेक बच्चनला म्हटले बेरोजगार; बहिण श्वेता म्हणाली, ‘अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं पटत नाही’!

Posted by - October 24, 2022 0
मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन याला आजपर्यंत नेहमीच त्याच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीमुळे ट्रोल करण्यात आले आहे. वडील अमिताभ बच्चन यांची आत्तापर्यंतची…
Junior Balaiah

Junior Balaiah : प्रसिद्ध तमिळ अभिनेते जूनियर बलैया यांचा गुदमरून मृत्यू

Posted by - November 2, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध तमिळ अभिनेतेते जूनियर बलैया (Junior…
Luana Andrade

Luana Andrade : हृदयविकाराचा झटका आल्याने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये 29 वर्षीय ब्राझिलियन मॉडेल व एन्फ्लुएन्सर लुआना…
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : शाहरुखच्या ‘जवान’ने रचला इतिहास; ‘या’ यादीत स्थान मिळवणारा ठरला पहिला भारतीय सिनेमा

Posted by - November 1, 2023 0
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने…

दिग्दर्शक केदार शिंदे यांचं ‘झुंड’ विषयीचे ट्विट चर्चेत ; प्रेक्षकांना केलं झुंड पाहण्याचं आवाहन

Posted by - March 7, 2022 0
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी कोरोना महामारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *