ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

301 0

मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक यांचे अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध असल्याचे आणि दाऊद ची बहीण हसीना पारकरला 55 लाख रुपये देऊन टेरर फंडिंग केल्याचा आरोप ईडीने केला होता.

मात्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी अधिकाऱ्यांचा फर्जिवडा उघडकीस आला. मलिक यांनी 55 नव्हे तर 5 लाख रुपये दिल्याचे न्यायालयात सांगितले, तसेच आमच्याकडून टायपिंग मिस्टेक झाली असेही कबूल केले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याच्या आरोपावरून ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती.

ईडीच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून मलिक यांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली.ईडी सारखी केंद्रीय तपास यंत्रणा अशा चुका कशा काय करू शकते? असा सवाल मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. मलिक यांच्यावर राजकीय सूड उगवण्यासाठी जुन प्रकरण मुद्दाम उकरून काढल जात असल्याचं आणि ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा देसाई यांनी युक्तिवाद करताना केला.

Share This News

Related Post

Amravati Accident News

Amravati Accident News : एक डुलकी 14 जणांच्या जीवावर बेतली! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Posted by - October 24, 2023 0
अमरावती : राज्यात अपघाताचे (Amravati Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. त्यातच समृद्धी महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. समृद्धी…

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडले ? तापमान नेमकं किती होते ?

Posted by - April 17, 2023 0
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर गौरविण्यात आले. मात्र, या भव्य कार्यक्रमात ११ जणांचा…

धनंजय मुंडे यांना यांना हार्टअटॅक नाही, अजितदादांनी केले स्पष्ट

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना भोवळ आली त्यामुळे शुद्ध हरपली. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खोटी असल्याचे…

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी

Posted by - April 14, 2023 0
जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत जम्मू-काश्मीरात बैसाखी…
Dr.Gaurav Gandhi

16 हजार हार्ट पेशंटला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरचा ‘हार्ट’नेच केला घात; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - June 7, 2023 0
अहमदाबाद : डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी देवच असतो. हे डॉक्टर कित्येकांचे प्राण ते वाचवतात. सध्या आपण अशाच एका डॉक्टरबद्दल बोलणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *