‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

488 0

मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते. असाच अनुभव बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आला आहे. ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी नेमका काय संदेश दिला हे पाहू.

धर्मेंद्र या वयात देखील नियमित व्यायाम करतात. म्हणूनच आजही ते ऍक्टिव्ह आहेत. पण अलीकडेच व्यायामाचा अतिरेक झाल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागले. व्यायाम करत असताना त्यांना पाठदुखीचा त्रास झाला, त्यानंतर त्यांना चार दिवस इस्पितळात दाखल करावे लागले. नुकताच त्यांना रविवारी इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.

इस्पितळातून घरी आल्यानंतर धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला. त्यामध्ये धर्मेंद्र म्हणतात. ‘मित्रांनो, कशाचाही अतिरेक करू नका. मी केले आणि मला त्रास झाला. पाठीचा एक मोठा स्नायू ओढला गेला. त्यामुळे मला इस्पितळात जावं लागलं. गेल्या चार दिवसांपासून खूप त्रास झाला. तरी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने मी परत आलो आहे. त्यामुळे, काळजी करू नका. आता मी खूप काळजी घेईन.’

बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र या नावाला वेगळे वलय आहे. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानीच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले. त्यानंतर हाणामारीच्या सिनेमा बरोबरच हलक्या फुलक्या कॉमेडी सिनेमामध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘अनुपमा’, ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘यकीन’, ‘सत्यकम’ आणि ‘सीता और गीता’, ‘लोफर’, ‘झील के उस पार’, ‘प्रतिज्ञा’ अशी त्यांच्या सिनेमाची प्रामुख्याने नावे घ्यावी लागतील.
लवकरच धर्मेंद्र हे करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत जया बच्चन, शबाना आझमी, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्यासोबत दिसणार आहे.

Share This News

Related Post

बालगंधर्व रंगमंदिराबद्दल बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार असे का म्हणाली ?

Posted by - May 18, 2022 0
मुंबई- कलाकार रंगभूमीची मनोभावे सेवा करत असतात. पण त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतात का ? हा खरा प्रश्न आहे. एखाद्या…

#HEALTH WEALTH : उन्हाळ्यात फिट अँड फाइन राहायचे असेल तर आज ‘या’ खाद्यपदार्थांपासून दूर राहा

Posted by - March 20, 2023 0
मार्च महिन्यापासून उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. अशावेळी हवामानातील बदलाबरोबरच तुम्ही आपल्या आहारातही…
latur Doctor

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Posted by - June 17, 2023 0
लातूर : रुग्णालयांमध्ये अनेकदा हलगर्जीपणामुळे काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. वेळेत उपचार न मिळाल्याने किंवा चुकीच्या उपचारांमुळे रुग्ण दगावल्याच्या…
Stress

Concentration : एकाग्रता कमी पडतीय तर करा ‘हा’ व्यायाम; झटपट दिसेल बदल

Posted by - February 18, 2024 0
तणाव किंवा झोपेची कमतरता यासारख्या साध्या गोष्टीमुळे लक्ष केंद्रित करण्यात समस्या उद्भवू शकते, परंतु ते नैराश्य किंवा चिंताचे लक्षण देखील…

‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

Posted by - June 1, 2022 0
पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *