सावधान ! मोबाइलमधील हे 7 धोकादायक Apps तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात

383 0

मुंबई- आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक app असतात. वेगवेगळ्या कामासाठी असलेले हे app तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. पण तुम्हाला माहित आहे का, स्मार्टफोनमधील काही app तुम्हाला मदत न करता तुमच्या बँक खात्यातून पैसे लंपास करतात.

सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या ताज्या अहवालात असे सूचित केले आहे की, प्ले स्टोअरवरील 200 हून अधिक Android Appsमध्ये फेसस्टीलर नावाचा धोकादायक स्पायवेअर आहे जो केवळ वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटाच नाही तर Facebook पासवर्ड आणि इतर अनेक तपशील देखील चोरू शकतो.

FaceStiller स्पायवेअरसह Trend Micro ला 40 हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनर अॅप्स सापडले जे क्रिप्टो संपत्ती चोरण्याचा आणि वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते.

अहवालात असे म्हटले आहे की त्यापैकी काही App 100,000 हून अधिक जणांनी इंस्टॉल केले होते. त्यातील काही अॅप्स चोरून संवेदनशील वापरकर्त्याची माहिती गोळा करत होते. ही आहे धोकादायक ऍपची यादी. पहा बरे या app पैकी तुमच्या मोबाइलमध्ये कुठले app नाही ना ?

1. डेली फिटनेस ओएल (Daily Fitness OL)
2. पैनोरमा कैमरा (Panorama Camera)
3. बिजनेस मेटा मैनेजर (Business Meta Manager)
4. स्वैम फोटो (Swam Photo)
5. एन्जॉय फोटो एडिटर (Enjoy Photo Editor)
6. क्रिप्टोमाइनिंग फार्म योर ओन कॉइन (Cryptomining Farm Your own Coin)
7. फोटो गेमिंग पजल (Photo Gaming Puzzle)

तेंव्हा तुमच्या मोबाइलमध्ये असे app असतील तर आत्ताच्या आता डिलिट करून टाका

Share This News

Related Post

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव

Posted by - March 28, 2022 0
सिंधुदुर्ग- कोकण म्हणजे सृष्टी सौंदर्याचा अनमोल खजिना, नारळी पोफळीच्या बागा, हापूस आंब्याचा दरवळ, फेसाळ लाटा अंगावर झेलणारा समुद्रकिनारा,जांभ्या दगडाची कौलारू…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कसा घ्यावा लाभ, जाणून घ्या

Posted by - February 4, 2022 0
नवीन वर्षात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या…

‘कच्चा बादाम’ गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या गायकाचा अपघात, गंभीर जखमी

Posted by - March 1, 2022 0
पश्चिम बंगाल- ‘कच्चा बादाम’ फेम गायकाचा अपघात झाला आहे. गायक भुबन बड्याकार याचा पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये अपघात झाला आहे. ज्यात…

जिओ , एअरटेल, व्हीआय चे आकर्षक प्लॅन सादर, तुमच्यासाठी योग्य प्लॅन निवडा

Posted by - April 30, 2022 0
Jio, Airtel आणि VI (Voda-Idea) ने त्यांच्या ग्राहकांसाठी 30 दिवस आणि एक महिना वैधता असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यापूर्वी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *