लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

277 0

पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक २७ मे रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमाला निमंत्रितांसाठी प्रवेश देण्यात आला आहे. मात्र हा सोहळा पुणेकरांना घरात बसून लाईव्ह पाहता येणार आहे.

पुणेकरांना घरबसल्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या यू टयूब आणि फेसबुक पेजवरुन या सोहळा लाईव्ह पाहण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. तरी नागरिकांनी आॅनलाईन सुविधेद्वारे कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले.

कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. त्यांनी निमंत्रण पत्रिकेसोबत आधार कार्डची मूळ प्रत देखील कार्यक्रमस्थळी आणायची आहे. त्याशिवाय सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच पेन, नाणी सोबत आणण्यास मनाई आहे. मोबाईलला परवानगी असून कार्यक्रम सुरु असताना मोबाईल बंद किंवा फ्लाईट मोडवर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

निमंत्रितांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था कॉंग्रेस भवन, शिवाजीनगर व मॉडर्न महाविद्यालय, जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आली आहे. मुख्य जंगली महाराज रस्त्यावर व लगतच्या रस्त्यावर कोठेही वाहने पार्क करता येणार नाहीत. सभागृहात प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे प्रवेश व आसनव्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरी निमंत्रितांनी सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान सभागृहात स्थानापन्न व्हावे. सकाळी ११ नंतर कोणालाही सभागृहात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Share This News

Related Post

Shruti Marathe

Shruti Marathe : ‘मी तुमच्याबरोबर झोपले तर…’ अभिनेत्री श्रुती मराठेने केला धक्कादायक खुलासा

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : मनोरंजन सृष्टीतील अनेक अभिनेत्री (Shruti Marathe) त्यांना आजवर कास्टिंग काऊच विषयी येणारे धक्कादायक अनुभव शेअर करताना दिसतात. त्यामध्ये…

प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशी होणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आदेश

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात शाहरुख पुत्र आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल (शुक्रवार)…
Amol Kolhe

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Posted by - May 10, 2024 0
शिरूर : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या…

Decision of Cabinet meeting : भातसा, वाघूर प्रकल्पांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : भातसा तसेच वाघूर प्रकल्पांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…

अभिमानास्पद : भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

Posted by - February 15, 2023 0
काश्मीर : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्य त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावेत. यासाठीच आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *