तांब्याच्या भांड्यातील पाणी का प्यावे ? जाणून घ्या कारणे…

386 0

धातूच्या भांड्यात खाणं-पिणं शरीरासाठी फायदेशीर असल्याचं प्राचीन काळापासून मानले जाते. त्यातही तांब्याचे भांडे अतिशय शुद्ध समजले जाते. अनेक घरांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्याचे तुम्हाला माहित आहे. पण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.

तांबे हे निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. जे लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते.

तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान ८ तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या.

शरीराच्या अंतर्गत सफाईसाठी तांब्याचं पाणी फायदेशीर आहे. याशिवाय हे पाणी यकृत आणि किडनी निरोगी ठेवतो. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचावासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणे लाभदायक असते.

तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की तांबे म्हणजेच तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात.

तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवता तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करते.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, कॅन्सरची सुरुवात रोखण्यास तांबे फायदेशीर आहे. यामध्ये कॅन्सरविरोधी घटक असतात.

सांधे किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्यामध्ये ठेवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे.

सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

मेंदूच्या आरोग्यासाठी तांबे खूप महत्वाचे आहे. कारण, तांबे मेंदूमध्ये उपस्थित न्यूरोट्रांसमीटर नियंत्रित करण्यास मदत करते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने स्मरणशक्तीही मजबूत होते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय वात, पित्त आणि कफच्या तक्रारी दूर करण्यातही फायदेशीर ठरते.

Share This News

Related Post

city of dreams

City Of Dreams 3 : बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

Posted by - May 12, 2023 0
मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर या सीरिजचा धमाकेदार टीझर…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मोठी पदभरती, या तारखेपासून सुरु होणार प्रक्रिया

Posted by - April 7, 2023 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे…

ओटिटीवर मार्च महिन्यात वेबसिरीजचा मारा, असे आहे ओटीटीचे वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
मार्च महिन्यात सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज यांचा मारा होणार आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेतील काही चांगले कंटेंट देखील…

#Netflix : या आठवड्यात OTT वर येत आहेत गुलमोहर आणि ताजसह हे चित्रपट आणि वेब सीरिज; लिस्ट पहाचं

Posted by - March 1, 2023 0
ओटीटी चित्रपट आणि वेब सीरिज : 7 फेब्रुवारी ते 5 मार्च मार्चला सुरुवात झाली असून ओटीटी स्पेसमध्ये या आठवड्यात अनेक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *