JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

358 0

JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत तारखा जाणून घेऊया.

यापूर्वी ही परीक्षा 16 ते 21 एप्रिल या कालावधीत होणार होती. सुधारित वेळापत्रकानुसार, परीक्षा आता 21, 24, 25, 29 एप्रिल आणि 01, 4 मे रोजी होणार आहे.फक्त सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने या सत्रासाठी जेईई मेन 2022 परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइटवर प्रसारीत केलेली नोटीस त्वरित तपासावी. NTA ने फक्त सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. परीक्षेच्या सुधारित तारखा देखील वेबसाइटवर देण्यात आल्या आहेत.

प्रसारीत केलेल्या नोटीसमध्ये, एनटीएने स्पष्ट केले आहे की परीक्षेची तारीख अनेक बोर्ड परीक्षांच्या तारखांशी जुळत होती. त्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

चंद्रग्रहण 2022 : विज्ञान काय सांगते? इतिहास, ज्योतिष वाचा सविस्तर माहिती

Posted by - November 8, 2022 0
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक…
Nagpur News

Nagpur News : नागपूर हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; नेमके काय घडले?

Posted by - July 3, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे…

शैक्षणिक : UGC चा मोठा निर्णय;पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा !

Posted by - November 22, 2022 0
शैक्षणिक : पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम आत्तापर्यंत तीन वर्षासाठी होता. परंतु आता पदवीसाठी असलेला अभ्यासक्रम चार वर्षांसाठीचा होणार आहे. युजीसीने घेतलेल्या…

Breaking ! टाईमपास म्हणून सलमानला धमकी दिल्याचे उघडकीस, राजस्थानचा अल्पवयीन ताब्यात

Posted by - April 12, 2023 0
अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन एका राजस्थानच्या…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *