केंद्र सरकार महिलांना देणार 2 लाख ?…जाणून घ्या सत्य

409 0

केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत सरकार देशातील गरीब, गरजू आणि विधवा महिलांना पैशांची मदत केली जाते. अलीकडेच युट्युबवरील एका व्हिडिओमध्ये सरकार महिलांना 2 लाख रुपये देत असल्याचा दावा केला गेला आहे. 

व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री महिला सहाय्य योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्व महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन लाख रुपये टाकणार आहे. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. जर तुम्ही आता अर्ज केला नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.’

 

या व्हिडिओचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला एका महिलेचा फोटो आहे. वरती ठळक अक्षरात लिहिले आहे – ‘प्रधानमंत्री महिला सहायता योजना.’ खाली लिहिले आहे- महिलांच्या खात्यात थेट 2 लाख रुपये मिळतील. संपूर्ण भारतात. म्हणजेच ही योजना देशभरातील महिलांसाठी आहे.

पीआयबीने या व्हिडिओची सत्यता तपासली असता त्यातील सत्य समोर आले आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा अफवांपासून सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. अशाप्रकारे पीआयबीने हा संदेश पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : देशात NIA आणि ED ची मोठी कारवाई ; PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक

Posted by - September 22, 2022 0
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात…
Gautami Patil Vs Madhuri Pawar

Gautami Patil Vs Madhuri Pawar : महाराष्ट्र गाजवणाऱ्या गौतमी पाटील आणि माधुरी पवार या नृत्यांगना आल्या समोरासमोर; कोण कोणावर पडलं भारी?

Posted by - August 9, 2023 0
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या दोन व्यक्ती म्हणजे नृत्यांगना माधुरी पवार आणि गौतमी पाटील (Gautami Patil Vs Madhuri Pawar). या दोघींनीही नृत्य…

वाढदिवस साजरा करताना हटकल्याने टोळक्याकडून ज्येष्ठ नागरिकाचा खून

Posted by - June 28, 2022 0
हिंजवडी- वाढदिवसाची पार्टी साजरी करत असताना शांत राहण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. बावधन…

धक्कादायक माहिती : 2012 ते 2022 या दहा वर्षांमध्ये संक्रमित रक्त दिल्याने 1442 निष्पाप नागरिकांना एचआयव्हीची लागण

Posted by - February 10, 2023 0
पेशंट राइट्स फोरम या संस्थेने आरटीआय कायद्या अंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात 2012 ते 2022…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *