arnold dix

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

372 0

उत्तराखंड : दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या मजुरांची सुटका करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील तज्ज्ञ अहोरात्र मेहनत करत होते. या बचावमोहिमेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. अखेर काल रात्री या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यात ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही बचावमोहीम राबवण्यात आली होती. त्यांच्या या कामगिरीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. चला तर मग अरनॉल्ड डिक्स कोण आहेत? याबद्दल माहिती जाणून घेऊया…

अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?
मुळचे ऑस्ट्रेलियाचे आणि जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे (जिनेव्हा) प्रमुख अरनॉल्ड डिक्स यांनी या मोहिमेत त्यांचे कौशल्य पणाला लावून मजुरांची सुटका करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. ते एक भूगर्भशास्त्र, अभियंता, वकीलही आहेत. डिक्स हे मोनॅश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याच्या शिक्षणात पदवीधर आहेत. ते एक निष्णात वकील म्हणूनदेखील ओळखले जातात. गेल्या तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली आहे. भूगर्भातील सुरक्षेविषयी त्यांनी आपले विशेष योगदान दिलेले आहे. त्यांनी 2016 ते 2019 या काळात कतारमधील रेड क्रिसेंट सोसायटी (QRCS) मध्येही काम केलेले आहे. अरनॉल्ड डिक्स यांनी 2020 साली अंडरग्राऊंड वर्क्स चेंबर तयार करण्यासाठी लॉर्ड रॉबर्ट मायर पीटर विकरी यांच्यासोबतही काम केलेले आहे.

अरनॉल्ड डिक्स यांना मिळालेले पुरस्कार
जमिनीत बोगदा तयार करण्याच्या तंत्रात डिक्स यांचा हातखंडा आहे. टोकियो सिटी विद्यापीठात ते व्हिजिटिंग प्राध्यापक आहेत. ते या विद्यापीठात इंजिनिअरिंग (बोगदे) बाबत अध्यापन करतात. त्यांच्या या कामाबद्दल डिक्स यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना 2011 साली अ‍ॅलन नेलँड ऑस्‍ट्रॅलेशियन टनेलिंग सोसायटीचा बाय-अ‍ॅन्यूअल पुरस्‍कार मिळालेला आहे. बोगदानिर्मितीत असलेल्या प्राविण्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. 2022 साली त्यांना अमेरिकेतील नॅशनल फायर प्रोटेक्शनतर्फे कमिटी सर्व्हिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

काय घडले होते नेमके?
चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे 41 मजूर या बोगद्यात अडकून पडले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी साधारण दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून प्रयत्न सुरू होते. मात्र शेवटी या प्रयत्नांना यश आले असून सर्व 41 मजुरांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

हे बचावकार्य करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), उत्तराखंडचे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) यांच्यासह अनेक यंत्रणांच्या हजारो अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. सर्व मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Mobile Number Suspended: सरकारची मोठी कारवाई ! 70 लाख मोबाईल नंबर केले बंद

Share This News

Related Post

David Warner

David Warner : वॉर्नरने मोडला सचिनचा ‘तो’ विक्रम; 6 हजार धावांचा टप्पादेखील केला पार

Posted by - September 10, 2023 0
सिडनी : सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने…
IND Vs AUS

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : सध्या भारतात आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा सुरु आहे. या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 सामन्याची…

#BJP HEMAT RASANE : भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट जाहीर झालेले हेमंत रासने यांचा संपूर्ण परिचय

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…
Dr Shobha Bachhav

Dr Shobha Bachhav : चर्चेतील चेहरा :डॉ. शोभा बच्छाव

Posted by - April 11, 2024 0
धुळे लोकसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार असलेले डॉ. सुभाष भामरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याच विरोधात आता काँग्रेसने डॉ. शोभा…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार

Posted by - April 1, 2024 0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघाकडे राज्याचेच नाहीतर देशाचं लक्ष लागलेलं असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *