सचिन तेंडुलकर वाढदिवस विशेष; क्रिकेटर ते राज्यसभा खासदार कसा आहे सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास

471 0

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा आज 50 वा वाढदिवस त्यानिमित्तानं सचिन तेंडुलकर याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा विशेष लेख

सुरुवातीचे जीवन

सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

राजकीय कारकीर्द

सचिन यांची राज्यसभा सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.

सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार 

२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते.

1994 मध्ये सचिन तेंडुलकरांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.

1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणारे सचिन हे पहिले क्रिकेटपटू बनले.

1999 मध्ये यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

2001 मध्ये महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला.

2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड प्राप्त झाला.

2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याची चर्चा कौतुकास्पद होती 

2014 भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित 

Share This News

Related Post

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…
Eknath Shinde

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा

Posted by - December 19, 2023 0
नागपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली…

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022 0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022…
Accident News

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Posted by - December 27, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या साईभक्तांच्या गाडीचा भीषण…

गुजरात मोरबी पूल दुर्घटना; मृतांचा आकडा 35 वर, पंतप्रधानांनी दुर्घटनेची महिती

Posted by - October 30, 2022 0
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *