Manoj Jarange

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

349 0

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापलेला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण आंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरु केले होते. शांततेत उपोषण सुरु असताना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन चिघळले आणि त्याने रौद्ररूप धारण केले. यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. यानंतर मनोज जरांगे हे नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी पोहोचले. अखेर आज त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करत GR देखील काढला. मात्र जरांगे पाटलांचा अंतरावली सराटी ते मुंबई हा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा
मनोज जरांगे गेल्या पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहे. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. यालाच गंगथडी म्हणतात. मनोज जरांगे गेल्या 15 वर्षांतील आंदोलनांमुळं गंगथडीचे नायक बनले होते. मराठा आरक्षण आंदोलन उभारणी करताना त्यांनी दोन महिने गंगथडीच्या आजूबाजूच्या 123 गावांमध्ये सभा घेत शहागड येथे रास्ता रोको केला होता. ग्रामीण भागातील मराठा शेतकरी शेतमालाचे भाव कोलमडल्यानं किमान कुणबी नोंदींद्वारे जात प्रमाणपत्र मिळून आरक्षण मिळाल्यास शैक्षणिक शुल्क कमी होईल आणि नोकरीत आरक्षण मिळेल या आशेने मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांचं निवेदन सरकारतर्फे तीन मंत्र्यांनी स्वीकारावं अशी त्यांची मागणी केली होती. ती मान्य न झाल्यानं मनोज जरांगे उपोषणाला बसले पुढे ते आंदोलन चिघळलं आणि लाठीचार्जनंतर ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या झोतात आले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरातील महसूल खात्यातील कागदपत्रांमध्ये असलेल्या कुणबी नोंदींची तपासणी सुरु झाली. राज्य सरकारनं न्या. शिंदे यांची समिती स्थापन केली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान अनेकांच्या कुणबी नोंदी समोर आल्या. मात्र, राज्य सरकारनं मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवताना सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची विनंती मान्य केली होती. मात्र, त्याची अमंलबजावणी होत नव्हती. मात्र, अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा त्यांनी काढला. अखेर नवी मुंबईत मनोज जरांगे आंदोलकांसह पोहोचले आणि राज्य सरकारनं कुणबी नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबतचं राजपत्र सरकारनं प्रसिद्ध केलं, अशा रितीनं मनोज जरांगे यांचा गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा असा प्रवास पूर्ण झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News

Related Post

Karan Pawar

Karan Pawar : चर्चेतील चेहरा : करण पवार

Posted by - April 3, 2024 0
महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात…
MHT CET Result

MHT CET परीक्षेचा निकाल 12 जून रोजी; सकाळी 11 वाजता होणार जाहीर

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET Result 2023) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Posted by - June 3, 2024 0
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उद्या अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. मात्र त्यागोदरच एक मोठी बातमी…
Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राज्यात सध्या संमिश्र वातावरण (Weather Update) आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या…
Dhangar Reservation

Dhangar Reservation: धनगर समाजाला मोठा धक्का ! हायकोर्टाने ‘ती’ मागणी फेटाळली

Posted by - February 16, 2024 0
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला (Dhangar Reservation) धक्का देणारा निर्णय दिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *