Ram Satpute

Ram Satpute : चर्चेतला उमेदवार राम सातपुते

417 0

मुंबई : देशभरात लोकसभेच्या रणधुमाळीत (Ram Satpute) सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येत आहे. रविवारी भारतीय जनता पक्षाची 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश होता. सोलापूर मतदार संघातून भाजपाकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आल्याने सोलापूर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. आज आपण राम सातपुते यांचा थोडक्यात जीवनप्रवास जाणून घेऊया…

राम सातपुते हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सामान्य कार्यकर्ते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली.राम सातपुते यांचा जन्म 12 मार्च 1988 रोजी महाराष्ट्र राज्यातील बीड मधील डोईठाण या गावी एका ऊस तोडणी करणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला. राम सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते हे त्यांच्या गावातील बसस्थानकावर चांभार म्हणून काम करायचे. लहानपणी राम सातपुते यांनी आपल्या आई-वडिलांना साखर कारखान्यात काम करत असताना ऊस तोडणीत मदत केली. शालेय जीवनातच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ओळख झाली. बीड जिल्ह्यातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात गेले. पीव्हीजीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा पूर्ण केला. 2015 मध्ये, त्यांनी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून मुद्रण तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली.

कॉलेजच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत प्रवेश केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात मोर्चे काढले. जवळपास एक दशक संस्थेसाठी काम करत असताना, 2016 मध्ये राम सातपुते यांची महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून निवड झाली.सरकारी अधिकाऱ्यांच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आंदोलनेही केली आहेत. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सामान्य कार्यकर्ते असणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा असणाऱ्या राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. माळशिरस मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या मोहिते पाटील गटाचे वर्चस्व परंतु या मतदारसंघातून भांबुर्डी या दुष्काळी गावातील एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्याने हा मतदारसंघ चांगला चर्चेत आला होता. परंतु या निवडणुकीत राम सातपुते यांनी प्रस्थापितांना धक्का देत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा 2702 मतांनी पराभव करत विजय मिळवला.

आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र लिहिलय. त्या पत्रात प्रणिती शिंदे म्हणाल्यात आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायम बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मांडणारे शहर आणि जिल्हा आहे तिथे सर्वांना मत मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो की बाहेरचा. मी सोलापूर जिल्ह्यात तुमचं स्वागत करते तसेच तुम्हाला उमेदवारीच्या निमित्ताने शुभेच्छा देते असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात. सोलापूर मतदारसंघातून राम सातपुते यांच्या रूपाने भाजपा विजयी घोडदौड कायम ठेवणार की काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha 2024 : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी अन् कोणाचा झाला पत्ता कट?

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Related Post

BJP New Slogan

अखेर ठरलं! नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीएला 294 जागांवर यश मिळाल्यानंतर आज दिल्लीतील संसद…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द; ‘या’ कारणामुळे नातवासोबत तातडीनं मुंबईला झाले रवाना

Posted by - October 23, 2023 0
पुणे : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. ते पंढरपुरात महाविकास आघाडीच्या बैठकीला…
Siddaramaiah

सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री; दुसऱ्यांदा घेतली शपथ

Posted by - May 20, 2023 0
कर्नाटक : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) एकतर्फी विजय मिळवत भाजपला (BJP) धूळ चारली होती. यानंतर काँग्रेसमध्ये…
narendra modi

कर्नाटकच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Posted by - May 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election) निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress)…
Sharad Pawar

Latur News : ‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

Posted by - October 27, 2023 0
लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू (Latur News) झाल्याची स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *