राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते कुशल संसदपटू; कसा आहे रामभाऊ म्हाळगी यांचा जीवनप्रवास

332 0

भारतीय जनसंघाचे पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी यांची आज जयंती 

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रचारक होते. साधारणपणे 1952 -53 च्या सुमारास ते राजकारणात आले.

सुरुवातीला भारतीय जनसंघ अर्थात आताचे भारतीय जनता पक्षाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी भारतीय जनसंघाच्या प्रचारासाठी आणि संघटात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रभर प्रवास केला. रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कुडूस गावामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी कुडूसमध्ये, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. रामभाऊ विद्यार्थी दशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. मद्रास व सोलापूर येथे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले. येथूनच त्यांच्या सार्वजनिक जीवनाला एका अर्थाने प्रारंभ झाला. पुढे त्यांनी गोवा विमोचन समितीच्या कार्यकारी समितीचे सचिव, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जनरल काउन्सिलचे सदस्य, महाराष्ट्र दुष्काळ निवारण समितीच्या जनरल काउन्सिलचे सदस्य म्हणूनही काम केले.

जनसंघाकडून विधानसभेत निवडून जाणारे पहिले आमदार

जनसंघाची स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिलेच आमदार होते. पुढे ते आपल्या कार्याच्या जोरावर जनसंघचे प्रदेशाध्यक्ष देखील बनले. त्यांची जडणघडणच संघाच्या मुशीत झाले. त्यांच्यावर विद्यार्थी दशेतच संघाचे संस्कार झाले. महाराष्ट्रात संघाची विचारसरणी रुजवण्यात रामभाऊ म्हाळगींचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या ठाई असलेली अभ्यासू वृत्ती. सुसंस्कृतपणा व साधेपणामुळे त्यांना जनसंघाचे द्रोणाचर्य म्हणून ओळखले जायचे. सत्तरच्या दशकात जनसंघाचे केवळ चारच आमदार विधानसभेत होते. त्यामध्ये रामभाऊ म्हाळगी यांचा समावेश होतो. जनसंघाचे जरी चारच आमदार असले तरी देखील रामभाऊ म्हाळगी यांचा त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणामुळे विधनसभेत मोठा दबदबा होता. पुण्याहून निवडून गेलेल्या रामभाऊ म्हाळगी हे बोलू लागले की, सर्व सभागृह शांत असायचे त्यांच्या भाषणात कधीही गोंधळ होत नव्हता.

कुशल संसदपटू

कुशल संसदपटू आदर्श लोकप्रतिनिधी आणि तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते यासोबतच संघ प्रचारक म्हणून रामभाऊ म्हाळगी यांना ओळखले जायचे. ते 1957, 1967 आणि 1972 असे तीन वेळा भारतीय जनसंघाकडून विधानसभेत आमदार तर 1977 व 1980 असे दोन वेळा ठाणे मतदार संघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. याचसोबत ते मध्य रेल्वे स्टेशन मास्टर्स संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुणे बार काउंन्सिलचे उपाध्यक्ष देखील होते. रामभाऊ म्हाळगी यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनसंघ महाराष्ट्रात वाढवण्याचे काम केले.

Share This News

Related Post

संविधानाच्या रक्षकांच्या रक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध : डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने मनासारखे राजकीय निर्णय घेण्याची सुरुवात केली आहे. यामध्ये काही वेळा…

कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू, संजय राऊत यांचा इशारा

Posted by - April 4, 2022 0
नवी दिल्ली- कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला…

राज ठाकरे यांची पुण्यात ‘या’ दिवशी सभा, सभेच्या परवानगी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले

Posted by - May 17, 2022 0
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होणार…
Prakash Ambedkar

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Posted by - March 9, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *