अभिमन्यू दासानीचा ‘निकम्मा’ रिलीज ! अभिमन्यूवर का होत आहे ‘नेपोटीझम’ची टीका 

304 0

मुंबई- बॉलीवूड आणि नेपोटीजम किंवा घराणेशाही यांचे घट्ट नाते आहे. बऱ्याच चित्रपटांमध्ये बॉलीवूड स्टार किड्सना काम करताना बघितले आहे. मग काहींमध्ये कला असते तर काहींना फक्त त्यांच्या चित्रपटांमध्ये वारसा असल्यामुळे संधी मिळते. पण ही संधी टिकवून ठेवण्यासाठी त्यांनाही तेवढीच मेहनत करावी लागते. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानी ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. आज हा चित्रपट रिलीज झाला आहे.

‘निकम्मा’ सिनेमात शिल्पा शेट्टी महत्वाच्या भूमिकेत आहे. ‘अभिमन्यु दसानी याच्या आयुष्यात जेव्हा शिल्पाची एन्ट्री होते. तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतात? तो कसा बदलतो? हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. शिल्पा ही या चित्रपटामध्ये सुपरवुमनच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी यांच्यासोबतच शर्ली सेतिया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. शर्ली आणि अभिमन्यु यांचा रोमँटिक अंदाज या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

अभिमन्यू ने यापूर्वी 2018 मध्ये ‘मर्द को दर्द नही होता’ या चित्रपटामध्ये झळकुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्यालाही ‘नेपोटीझम’चा फटका बसला आहे. स्टार किड्स असण्याचे तोटे काय असतात हे अभिमन्यूने सांगितले आहे. त्याला याचा चांगला अनुभवही आला असे त्याने सांगितले. अभिमन्यूच्या अभिनयाला आणि चित्रपटांना चाहत्यांच्या चांगला प्रतिसाद मिळत असेल पण अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा म्हणून लोकांना तो आवडलेला नाही.

अभिमन्यू दासानी म्हणतो, ‘मला सकाळी उठल्यावर अनेक वाईट मेसेज येतात . आणि माझ्या इथपर्यंत येण्याला अपात्र समजतात. मी बॉलिवूड स्टार आहे म्हणून मला कमी लेखणे हे चुकीचे आहे . ज्यांना चित्रपटबंद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासमोर मला स्वतःला सिद्ध करायचं आहे.

‘मी वयाच्या १५ व्या वयापासून माझ्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला , फॅमिली कडून पैसे न घेता स्वतःच्या करियर वर लक्ष केंद्रित केले, असे सांगितले . त्याने वयाच्या 15 व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली . ‘ दम मरो दम ‘ आणि ‘ नौटंकी साला ‘ या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Share This News

Related Post

बांधकाम व्यावसायिक गणेश भिंताडे यांचे निधन

Posted by - February 7, 2022 0
पुणे- बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे कार्यकर्ते गणेश भिंताडे (वय ४४) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. आज पहाटे…

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Posted by - April 15, 2024 0
मुंबई : रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी…

Pune News : पुरंदरमधील वाल्हे येथे घर, किराणा दुकानाला भीषण आग

Posted by - November 3, 2023 0
पुरंदर : पुरंदरमधील वाल्हे येथे मुख्य बाजारपेठेतील राजकिशोर काबरा व राजगोपाल काबरा यांच्या घर व किराणा दुकानाला गुरुवारी रात्री 8…
Navi Mumbai

Navi Mumbai : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यामुळे आक्रमक होऊन ट्रकचालकांनी पोलिसांना केली मारहाण

Posted by - January 1, 2024 0
नवी मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही (Navi Mumbai)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *