युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी सुखरूप परतले

93 0

नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.

युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, “काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अ‍ॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो.” युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

युक्रेनवरील हल्ल्यावर भारताची प्रतिक्रिया

रशियाने क्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांनी चर्चेतून समस्येवर तोडगा काढावा, असेही सांगण्यात आले. भारताने बदललेल्या घडामोडींना संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

Share This News

Related Post

पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला…

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

Posted by - April 12, 2023 0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.…
ganapati visarjan

श्री गणेश मूर्तीची दहा दिवस स्थापना आणि त्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन…! काय सांगते पौराणिक कथा

Posted by - September 9, 2022 0
दरवर्षी आपण श्री गणेशाची मूर्ती घरामध्ये आणि मोठमोठे मंडळे देखील मंडप बांधून श्री गणेशाच्या सुंदर मोठ्या मूर्ती स्थापन करतात. श्री…

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा; स्वतः आव्हाडांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - November 14, 2022 0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.…
Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! कुटुंबावर दुहेरी संकट, मायलेकीचा शॉक लागून मृत्यू तर मुलगा रस्ते अपघातात जखमी

Posted by - August 7, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील (Nashik News) ओझर परिसरात मायलेकीचा मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *