रशियाने युक्रेनवर केलेल्या गोळीबारात मृत पावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा कोण आहे आणि तेव्हा काय घडलं?

424 0

युक्रेनच्या खारकीवमध्ये रशियाच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शेखरप्पा ग्यानगौडा नवीन असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.शेखरप्पा ग्यानगौडा नवीन हा मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्यातील विद्यार्थी आहे. तो एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होता.

काय घडलं ?

किराणा विकत घ्यायला नवीन बाहेर होता आणि त्याच वेळी तिकडे मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला आणि त्यात नवीनच मृत्यू झाला.हा गोळीबार युक्रेनच्या सैन्याचा नव्हता तर हा गोळीबार हा रशियाच्या सैन्याचा होता.आता त्याचा मृतदेह शवागृहमध्ये आहे, लवकरात लवकर मृतदेह भारतात आणण्याची व्यवस्था करत आहेत.नवीनच्या मित्रांकडून त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

ही माहिती नवीनच्या भावाने परराष्ट्र मंत्रालयाला फोन केल्यानंतर देण्यात आली आहे.अजूनही अनेक विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकलेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी नवीनच्या मृत्यूनंतर मोठ्या दहशतीच्या वातावरणात आहेत.परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन शेखरप्पाच्या घरी फोन केला आणि त्याच्या वडिलांशी फोन बोलले. पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त करत कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. दुसरीकडे खारकीव्हमधील परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे समोर आले आहे. तिथे अडकेल्या भारतीयांची सुरक्षा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रधान्याने सरकार काम करत आहे, असे केंद्र सरकारमधील सुत्रांनी सांगितले.

Share This News

Related Post

Crime

कचरा वेचणाऱ्यांवर उकळते पाणी ओतले. दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी, सासवडमधील घटना

Posted by - June 3, 2022 0
पुणे- पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या तिघांवर एका हॉटेल चालकानं उकळतं पाणी ओतले. यामध्ये…

पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

युके कोर्टाने निरव मोदीची याचिका फेटाळली; उच्च न्यायालयाने निरव मोदीला भारताकडे सोपवण्याचे दिले आदेश

Posted by - November 9, 2022 0
नवी दिल्ली : युके कोर्टाने निरव मोदीची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने निरव मोदी याला भारताकडे सोपवण्याचे आदेश दिले…
Weather Update

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Posted by - April 29, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रावर अजूनही अवकाळी पावसाचे (Weather Update) ढग कायम आहेत. आज आणि उद्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

ग्रामीण भागात हेलिपॅड ठीकंय, पण…; मुख्यमंत्र्यांच्याच गावाजवळ शिक्षणाच्या प्रश्नाची कोर्टाने घेतली दखल

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : खिरखंड या गावाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव आहे आणि त्या गावात चांगले रस्ते, रुग्णालय, शाळा नाही. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *