bhopal vote

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

1192 0

भोपाळ : देशात लोकसभेच्या तीन टप्प्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील भोपाळच्या बिरासियामधील असल्याची माहिती समोर येत असून या व्हिडीओमध्ये चक्क एक लहान मुलगा ईव्हीएमवरील बटण दाबून मतदान करताना दिसत आहे.

नेमके काय आहे व्हिडिओ मध्ये?

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीचे पंचायत सदस्य असलेले विनय मेहर यांच्या मुलाचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आले असून विनय यांच्याबरोबर त्यांच्या मुलगा मतदानासाठी गेला असताना विनय यांनीच हा व्हिडीओ काढल्याचे व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. मंगळवारी म्हणजेच 7 मे रोजी मतदानकेंद्रावर मतदान करताना विनय यांनी आपल्या मुलाला ईव्हीएमवरील बटण दाबायला सांगितलं आणि हा व्हिडीओ काढला असं दिसत आहे. वडिलांच्यावतीने त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचं कॅमेरात रेकॉर्ड झाले आहे. तर यानंतर विनय मेहेर हे, “ओके, हे पुरेसं आहे,” असं म्हणत असल्याचे ऐकू येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तपासाचे आदेश…
या प्रकरणावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही आहे. मात्र, जिल्हाधिकारी कुशलेंद्र विक्रम सिंह यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तेथील निवडणूक अधिकारी संदीप सियानी यांना निलंबित करण्यात आले असून भाजपा नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

 

Share This News

Related Post

रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने रवाना

Posted by - February 26, 2022 0
नवी दिल्ली- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. रोमानियाहून 219 भारतीयांना घेऊन विमान मुंबईला रवाना…
Pankaja-Munde

BJP National Executive : भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर; पंकजा मुंडेकडे दिली ‘ही’ जबाबदारी

Posted by - July 29, 2023 0
पुणे : भाजपकडून नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची (BJP National Executive) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 38 जणांना स्थान देण्यात…

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा…

…तर नवं सरकार अवैध ठरेल ; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; वाचा आज काय घडले ?

Posted by - February 23, 2023 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनवाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली…

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Posted by - March 15, 2022 0
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *