Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसला लागली आग; आगीचं कारण आले समोर

603 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Express) सी -14 या बोगीमध्ये बॅटरीला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
राणी कमलापतीहून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या सी-14 डब्याला आग लागली. गाडी क्रमांक 20171 भोपाळ-हजरत निजामुद्दीन वंदे भारत पहाटे 5.40 वाजता निघाली. बीना स्टेशनच्या अलीकडेच ही घटना घडली. ट्रेनमध्ये (Vande Bharat Express) प्रवास करणाऱ्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, बॅटरीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आगीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोटमध्ये एकूण 36 प्रवासी होते जे सकाळी सात वाजता कुरवाई केथोरा येथे ट्रेनमधून उतरले. डब्यातील बॅटरीला आग लागल्याने हा अपघात झाला. कुरवाई केथोरा स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याचे भारतीय रेल्वेनेकडून सांगण्यात आले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण वंदे भारत ट्रेन रिकामी करण्यात आली. मध्य प्रदेशच्या राणी कमलापती स्टेशन आणि दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशन दरम्यान धावणारी ही ट्रेन मध्य प्रदेशची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे.

Share This News

Related Post

sunil chetri

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Posted by - May 16, 2024 0
सुनील छेत्री : भारतीय फुटबॉल टीमचा लोकप्रिय खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का देत कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप…
Tractor

ट्रॅक्टरवरची स्टंटबाजी जीवावर बेतली; थरकाप उडवणारा Video व्हायरल

Posted by - June 10, 2023 0
आजकाल लोकांमध्ये स्टंटबाजी करण्याची क्रेज निर्माण झाली आहे. जो तो उठतोय तो स्टंट करत सुटतोय. मात्र कधी कधी हे स्टंट…
election-voting

ईव्हीएममध्ये कॅमेरा?… बोटाला शाईही नाही?… कधीपासून होणार बदल…

Posted by - May 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे.…
Akola News

Akola News : मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - June 6, 2024 0
अकोला : राज्यात अपघाताचे प्रमाणात (Akola News) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि…

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; जगदीप धनकड की मार्गरेट अल्वा कोण मारणार बाजी?

Posted by - August 6, 2022 0
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज (ता.6 ऑगस्ट) मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *