Uday Kotak

Uday Kotak : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा

3058 0

उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने शनिवारी 2 सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना पाठवलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली. उदय कोटक यांच्या जागी सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत. उदय कोटक बँकेत बिगर कार्यकारी संचालक म्हणून कायम राहणार आहेत. बँकेचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून उदय कोटक यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 रोजी संपणार होता.

उदय कोटक यांनी पत्रामध्ये काय म्हंटले?
बँकेच्या संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात उदय कोटक म्हणाले, “मी या अद्भुत कंपनीचा संस्थापक, प्रवर्तक आणि महत्त्वपूर्ण भागधारक म्हणून एकटा उभा होतो. या बदलत्या काळात मी पुढील वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. २ सप्टेंबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये कोटक यांनी सांगितले की, बँकेची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ते पद सोडत आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, “कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष, मी आणि आमचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक या तिघांनाही या वर्षाच्या अखेरीस पायउतार व्हायचे आहे. त्यामुळे सध्या माझे मुख्य लक्ष उत्तराधिकार नियोजनावर आहे. बँक प्रणालीत एक सुरळीत व्यवस्था असली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. या सर्व पदांसाठीची प्रक्रिया मी आता सुरू करीत आहे आणि त्यासाठी मी स्वतः सीईओ पदावरून पायउतार होत आहे.

उदय कोटक यांची कारकीर्द
उदय कोटक यांनी 1985 मध्ये ही संस्था बिगर बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून सुरू केली, जी नंतर बँक बनली. तेव्हापासून ते या बँकेचे नेतृत्व करीत होते. 2023 मध्ये ते व्यावसायिक कर्जदार बनले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, उदय कोटक यांची एकूण संपत्ती सुमारे 13.4 अब्ज डॉलर आहे.

Share This News

Related Post

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022 0
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं…
Thackeray Group

Thackeray Group : ठाकरे गटाला मोठा धक्का! आदित्य ठाकरेंचा ‘हा’ विश्वासू सोडणार साथ

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40आमदारांसह बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) मोठा धक्का बसला होता. यानंतर…

धक्कादायक : खेळताना बॉल काढण्यासाठी डबक्यात वाकला, तोल जाऊन पडल्याने बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 25, 2023 0
कल्याण : कल्याण पूर्वेकडील कैलास नगर परिसरात राहणारा बारा वर्षीय रियाज शेख हा मुलगा शाळा सुटल्यानंतर घराजवळच असलेल्या एका डबक्यात…

मोठी बातमी ! राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी होणार सुनावणी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा; खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना

Posted by - January 23, 2023 0
पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *