Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Ayodhya : ‘त्या’ ऐतिहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात!

1595 0

अयोध्या : प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर (Ram Mandir Ayodhya) येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. ते विधी कोणते आहेत? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

आजपासून सुरू होणाऱ्या धार्मिक विधींमध्ये रामलल्लाच्या मूर्तीच्या विग्रह विधी करण्यात येणार आहे. त्यासोबत गर्भगृहात रामलल्ला मूर्तीचा प्रवेश, गणेशाची पूजा, यज्ञकुंडाची स्थापना, गर्भगृहाचं पावित्र्य, शय्येचा निवास आणि त्यानंतर सिंहासनावर मूर्तीची प्रतिष्ठापना असे धार्मिक विधी संपन्न होणार आहे. त्याशिवाय फलाधिवासामध्ये मूर्ती फळांमध्ये ठेवण्यासाठीही पूजा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे रामलल्ला यांच्या निद्रेसाठीही व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठीही एक विधी करण्यात येणार आहे. या विधीमध्ये रामलल्ला यांना नव्याने बनवलेल्या गुलाबाच्या पलंगावर झोपवले जाणार आहे. त्यासाठी खास गादी, रजाई, बेडशीट, उशी आदी साहित्यदेखील तयार करण्यात आले आहे.

कोणत्या दिवशी कोणती पूजा करण्यात येणार?
16 जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन
17 जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश, गर्भगृहाचे शुद्धीकरण
18 जानेवारी (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास
19 जानेवारी (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
19 जानेवारी (संध्याकाळी) : धनाधिवास
20 जानेवारी (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास
20 जानेवारी (संध्याकाळी) : पुष्पाधिवास
21 जानेवारी (सकाळी) : मध्याधिवास
21 जानेवारी (संध्याकाळी) : शैयाधिवास

कोणत्या दिवशी कोणते विधी करण्यात येणार?
16 जानेवारी 2024 : आजपासून रामललाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधीला सुरुवात
17 जानेवारी 2024 :रामलल्लाची मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढणार
18 जानेवारी 2024 : अभिषेक विधीला सुरुवात होणार. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मर्तिक पूजा
19 जानेवारी 2024 : राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन आणि आग विशिष्ठ पद्धतीने पेटवली जाईल.
20 जानेवारी 2024 : राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र करण्यात येईल. ज्यामध्ये विविध नद्यांचे पाणी जमा करुन वास्तुशांती विधी
21 जानेवारी 2024 : यज्ञविधीमध्ये, विशेष पूजा आणि हवन दरम्यान, रामलल्लाला 125 कलशांसह दिव्य स्नान
22 जानेवारी 2024 : मध्यकाळात मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा
22 जानेवारी 2024 : सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Accident : मुंबईमध्ये भीषण अपघात; डंपरने दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Share This News

Related Post

उपोषण करून सरकारला जाब विचारणाऱ्या अण्णांच्या विरोधात आता आंदोलन !

Posted by - May 19, 2022 0
राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात…

‘नमो शेतकरी महासन्मान’ : शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये, नेमकं काय म्हणाले अर्थमंत्री , वाचा सविस्तर

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात अली असल्याचे सांगितलं आहे.…
Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Posted by - June 8, 2023 0
वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका…

धर्मवीर’ चित्रपटाचे ट्रेलर उत्साहात लॉन्च; सोहळ्याला सलमान खानची हजेरी (व्हिडिओ)

Posted by - May 9, 2022 0
मुंबई- धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी अत्यंत दिमाखात…
Obc Reservation

Obc Reservation: अखेर ! 21 दिवसांनंतर ओबीसी आंदोलन मागे

Posted by - September 30, 2023 0
चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून (Obc Reservation) मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरु होते. दरम्यान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *