Siddaramaiah

सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री; दुसऱ्यांदा घेतली शपथ

572 0

कर्नाटक : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) एकतर्फी विजय मिळवत भाजपला (BJP) धूळ चारली होती. यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे दोघेही मुख्यमंत्रिपदासाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. अखेर यामध्ये सिद्धरामय्या यांनी बाजी मारली आणि दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

या शपथविधीवेळी काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातल्या समविचारी पक्षांच्या नेत्यांना अमंत्रण देण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियकां गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुला हे नेते उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र उद्धव ठाकरे हे काही करणास्थाव या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती.

Share This News

Related Post

काल महाआरती आज पत्रकार परिषद ; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष

Posted by - April 17, 2022 0
राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल पुण्यातील खालकर चौकातील हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून…
Baburao Kohalikar

Hemant Patil : हेमंत पाटलांचा पत्ता कट करत हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 3, 2024 0
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे…
Rahul Narvekar

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अधिकृत मेल हॅक (Email Hack) करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ…

केदारनाथ पायी चालण्याच्या मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी देणारा जिओ पहिला ऑपरेटर

Posted by - May 29, 2022 0
डेहराडून- केदारनाथ धाम मंदिर पायी चालण्याच्या मार्गावर मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा रिलायन्स जिओ पहिला ऑपरेटर बनला आहे. जिओ गौरीकुंड ते…
Amit Thackeray

Amit Thackeray : टोलनाका तोडफोड प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर

Posted by - July 25, 2023 0
नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *