रशिया-युक्रेन युद्ध : खारकीव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

397 0

युक्रेनमधील खारकीव शहरात रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठ फ्लाईट भारतात आल्या आहेत. सोमवारी सकाळी आठवी फ्लाईट बुडापेस्टहून दिल्लीत दाखल झाली. यात 218 भारतीय नागरीक होते.

तसेच नवव्या फ्लाईटने उड्डाण घेतल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिली. ‘ANI’या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यूएसच्या Maxar Technologies नावाच्या एका खासगी कंपनीने कीव्हच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या रशियाच्या सैन्य ताफ्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

 

जवळपास 64 किलोमीटर लांबीचा हा ताफा आहे. युक्रेनविरूद्ध युद्धाची सुरुवात केल्यापासूनचा हा सर्वात मोठा सैन्य ताफा आहे. याआधी रशियाने 27 किलोमीटर लांबीचा सैन्य ताफा पाठवला होता. नव्या सैन्य ताफ्यामध्ये शेकडो वाहने असून यात रणगाडे, अर्टलरी गन, हत्यारबंद गाड्या यांचा समावेश आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने आज एक सूचनावली जारी केली आहे.

बस, ट्रेन अथवा मिळेल त्या साधनाने हिंदुस्थानी नागरिकांनी कीव सोडावे असे निर्देश यात देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांमध्ये कीवमध्ये मोठी घडामोड होणार असल्याची चिन्हे आहेत.

Share This News

Related Post

Eknath Shinde

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रौत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करुन देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - February 4, 2024 0
मुंबई दि.४- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानाला…

१४ तासानंतर सापडला संगणक अभियंत्याचा मृतदेह, पुणे जिल्ह्यातील घटना

Posted by - April 8, 2023 0
पानशेत परिसरातील धिंडली (वरघड) येथील एका रिसॉर्टच्या बॅक वॅाटरच्या पाण्यात परप्रांतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पाय घसरून पडल्याची घटना शुक्रवारी (ता. ०७)…

पठाणचा बिकनी वाद : सेन्सर बोर्डाने सांगितले ‘हे’ बदल; दीपिकाच्या बिकनीचा रंग बदलणार का ?

Posted by - December 29, 2022 0
मुंबई : चार वर्षानंतर कमबॅक करताना शाहरुख खान आपल्या पठाण चित्रपटांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता राहू नये याची चांगलीच काळजी घेत…

मराठवाड्यात थंडीचा मुक्काम वाढला, पुढच्या दोन दिवसात तापमान आणखी घसरणार

Posted by - February 9, 2022 0
औरंगाबाद- थंडीने राज्यातून काढता पाय घेतला असे वाटत असतानाच थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील तापमान एक…

#GOLD RATE TODAY : लग्नसराईत दिलासादायक बातमी; सोन्या-चांदीचे दर घसरले ; आजचे दर पहाचं

Posted by - February 27, 2023 0
महाराष्ट्र : आजच्या बुलियन्स वेबसाईटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटचा सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये झाला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *